रत्नागिरी : शिवसेना (Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा रत्नागिरी दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात त्यांनी उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर घणाघती टीका केली होती. या टीकेला सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जे काँग्रेसच्या (Congress) कुबड्या घेऊन नाचत आहेत, त्यांनी कोणालाही लाथ घालायची भाषा करु नये, असे सामंत (Uday Samant On Uddhav Thackeray) यांनी म्हटले. ते ऑनालाईन पत्रकार परिषदेत बोलत होते.
मंत्री उदय सामंत म्हणाले, रत्नागिरीत छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा आणि विठ्ठल मूर्तीच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आपण केला. या दोन कार्यक्रमांच्या मधे एक करमणुकीचाही कार्यक्रम होता, असा चिमटा सामंत यांनी ठाकरे यांच्या सभेबद्दल काढला. उदय सामंत म्हणाले, आधी जे शिवाजी पार्कवर सभा घेत होते, त्यांच्यावर आता रस्त्यावर, बोळात, चावडीवर सभा घेण्याची वेळ आली आहे. ही सभा म्हणजे टोमणे आणि कुटुंबाच्या बदनामीचा कार्यक्रम होता.
उदय सामंत म्हणाले, आपण गद्दाराच्या पेकाटात लाभ घालायला आलो आहोत, असे पक्षप्रमुख म्हणाले. मात्र काँग्रेसच्या कुबड्या घेऊन नाचणाऱ्यांनी लाथ घालायची भाषा करु नये. उदय सामंत म्हणाले, गद्दारांना गाडायचे आहे, या उद्धव ठाकरे यांच्या बोलण्याशी मी पूर्ण सहमत आहे. बाळासाहेब सांगायचे की मी शिवसेनेची कधी काँग्रेस होऊ देणार नाही. अशी वेळ आली तर पक्ष बंद करू. पण आता ठाकरे शिवसेना काँग्रेससोबत गेली आहे. ही खरी गद्दारी आहे आणि ती गाडायला हवी आहे.
ठाकरे यांनी सामंतांच्या संपत्तीवरून केलेल्या टीकेवर ते म्हणाले, माझ्या वडिलोपार्जित बांधकामाच्या व्यवसायावरुन ठाकरे यांनी टीका केली. पण एक गोष्ट चांगली आहे की आमचा व्यवसाय आहे, हे त्यांनी मान्य केले. कोणताही व्यवसाय नसताना त्यांनी सहा मजली घर कसे बांधले, हा प्रश्न आपण आजपर्यंत कधीही विचारला नाही आणि यापुढेही विचारणार नाही.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Parliament Budget Session | नारायण राणेंना इंग्रजीत विचारला प्रश्न, दिलं भलतंच उत्तर, अडचणीत आणणारा खासदार भाजपाचाच, पुढे घडलं असं…
Pune Crime News | पिंपरी : किरकोळ कारणावरुन महिलेला मारहाण, चार जणांवर FIR
Pune Crime News | पिंपरी : प्रेमसंबंधातून मुलीला पळवून नेल्याच्या संशयातून घरातील सामानाची तोडफोड
Pune Crime News | पिंपरी चिंचवड पोलिसांकडून तडीपार गुन्हेगाराला कोयत्यासह अटक
ACB Trap News | एक कोटीची लाच मागणाऱ्या सहायक राज्यकर आयुक्तांवर एसीबीकडून FIR
Pune Fire News | महंमदवाडी येथील इमारतीच्या 11 व्या मजल्यावर भीषण आग (Video)