पिंपरी : Pune Crime News | प्रेमसंबंधातून (Love Affair) मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरून चार जणांनी घरात घसून सामानाची तोडफोड करुन नुकसान केली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रविवारी (दि.4) रात्री साडे आठच्या सुमारास चिंचवड येथील इंदिरानगर येथे घडली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
याबाबत एका महिलेने सोमवारी (दि.5) पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहेत. यावरुन बाळु हसराज भांडे (वय-42), रमेश चंद्रकांत चौधरी (वय-35), शुभम बाळु भांडे (वय-18), ओंकार बालु भांडे (वय-19 सर्व रा. इंदिरा नगर, चिंचवड) यांच्यावर आयपीसी 452, 427, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाळु भांडे याच्या मुलीचे आणि फिर्य़ादी यांच्या मुलाचे प्रेमसंबंध आहेत. आरोपीची मुलगी घरातून निघून गेली आहे. फिर्यादी यांच्या मुलानेच प्रेमसंबंधातून मुलीला पळवून नेली असल्याचा संशय आरोपींना होता. याच संशयातून आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांच्या घरी गेले.
त्यांना भीती घालण्यासाठी त्यांच्या घरावर हल्ला केला. तसेच घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. आरोपींनी घरातील टीव्ही, कपाट, गॅस शेगडी, होम थेटर, भांडीकुंडी तोडून अंदाजे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pune Crime News | पिंपरी चिंचवड पोलिसांकडून तडीपार गुन्हेगाराला कोयत्यासह अटक
ACB Trap News | एक कोटीची लाच मागणाऱ्या सहायक राज्यकर आयुक्तांवर एसीबीकडून FIR
Pune Fire News | महंमदवाडी येथील इमारतीच्या 11 व्या मजल्यावर भीषण आग (Video)