नवी दिल्ली : सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Parliament Budget Session) सुरू असून राज्यसभेत महाराष्ट्रातील एका केंद्रीय मंत्र्याच्या बाबतीत मोठा अडचणीचा प्रसंग घडला आहे. सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना एका खासदाराने इंग्रजीत प्रश्न विचारला, आणि नारायण राणे यांची भंबेरी उडाली. प्रश्न एक आणि उत्तर भलतेच सुरू केल्याने सभागृहात कुजबूज सुरू झाली. मात्र, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह यांनी वेळीच हस्तक्षेप करून राणे यांना सावरून घेतले.(Parliament Budget Session)
विशेष म्हणजे राणेंना इंग्रजीत प्रश्न विचारणारे हे खासदार भाजपाचेच आहेत. भाजपा खासदार कार्तिकेय शर्मा (BJP MP Kartikeya Sharma) असे त्यांचे नाव आहे. शर्मा यांनी नारायण राणे यांना विचारले की, एमएसएमई क्षेत्रातील कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारने कोणती पावले उचलली आहेत? मात्र, प्रश्न इंग्रजीत विचारल्याने राणे यांना काहीच कळले नाही.
एमएसएमईमध्ये निर्यात तशा पद्धतीने वाढवणार याबाबत राणे बोलू लागले. त्यानंतर काही खासदारांनी गोंधळ करायला सुरूवात केली. यामुळे राणेंची आणखी त्रेधा तिरपिट उडाली. गोंधळलेले नारायण राणे हे एमएसएमई क्षेत्रात निर्यात वाढविण्यासाठी सरकारकडून मेक इन इंडिया योजनेच्या अंतर्गत विविध कार्यक्रम आखलेले आहेत, असे सांगू लागल्याने राणे गडबडल्याचे उपस्थित खासदारांच्या लक्षात आले आणि गोंधळ सुरू झाला.
गोंधळ करत असलेल्या खासदारांना राणे हे… तुम्ही ऐका.. तुम्ही ऐकून घ्या, असे म्हणत होते. यावेळी, क्या… काय केलं…
असेही ते हळु आवाजात म्हणाले. कारखाने सुरू झाले नाहीत, तर कामगारांचे प्रश्न सुटतील का? असे तावातावाने राणे
बोलत राहिले. त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने खासदारही आक्षेप घेत होते.
यावेळी राणेंच्या मदतीला राज्यसभेचे उपाध्यक्ष, पीठासीन अधिकारी हरिवंश नारायण सिंह धावून गेले. त्यांनी राणे यांना कार्तिकेय यांनी नेमका काय प्रश्न विचारला, हे हिंदीतून सांगितले. यानंतर संबंधित खासदार महोदयांना बोलावून एमएसएमई क्षेत्रातील कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार काय पावले उचलत आहे, हे तुम्ही त्यांना सांगा, असे निर्देश हरिवंश नारायण सिंह यांनी दिले…आणि नारायण राणे यांची या अवघड प्रसंगातून सुटका झाली.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pune Crime News | पिंपरी : किरकोळ कारणावरुन महिलेला मारहाण, चार जणांवर FIR
Pune Crime News | पिंपरी : प्रेमसंबंधातून मुलीला पळवून नेल्याच्या संशयातून घरातील सामानाची तोडफोड
Pune Crime News | पिंपरी चिंचवड पोलिसांकडून तडीपार गुन्हेगाराला कोयत्यासह अटक
ACB Trap News | एक कोटीची लाच मागणाऱ्या सहायक राज्यकर आयुक्तांवर एसीबीकडून FIR
Pune Fire News | महंमदवाडी येथील इमारतीच्या 11 व्या मजल्यावर भीषण आग (Video)