पिंपरी : Pune Crime News | तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी पोलीस ठाण्यातील (Pimpri Police Station) तपास पथकाने लोखंडी कोयत्यासह (Koyta) अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि.5) सायंकाळी सहाच्या सुमारास लिंक रोड चिंचवड येथील स्मशानभुमीच्या समोरील मोकळ्या पटांगणात केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
अमन आजिम शेख (रा. आर्य समाज चौक, रामकृष्ण नगर, पिंपरी) याच्यावर आर्म अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत पोलीस हवालदार रोहित सुधाकर पिंजरकर (वय-34) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.
पिंपरी पोलीस ठाण्यातील तपास पथकाला तडीपार गुन्हेगार लिंक रोड चिंचवड येथील स्मशानभूमीच्या समोरील रस्त्यावर थांबला असून त्याच्याकडे धारदार हत्यार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथकाने त्याठिकाणी जाऊन आरोपी अमन शेख याला ताब्यात घेतले.
त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे पाचशे रुपयांचा लोखंडी कोयता आढळून आला. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याला तडीपार करण्यात आले होते. तडीपारीच्या आदेशाचा भंग करुन तो विनापरवाना पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत वावरताना आढळून आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pune Fire News | महंमदवाडी येथील इमारतीच्या 11 व्या मजल्यावर भीषण आग (Video)
ACB Trap News | आदिवासी व्यक्तीकडून लाच स्वीकारताना लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
PMC Recruitment Civil Engineer | पुणे महापालिका : सिव्हिल इंजिनियर पदाच्या 113 जागांसाठी 29 हजार 924 अर्ज
Pune Crime News | नात्यातील मुलाकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, कोंढवा परिसरातील घटना
Pune Crime News | जुन्या भांडणाच्या कारणावरुन मोठा भाऊ, वहिनीच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न
Pune PMC – Swachh Bharat Mission | स्वच्छ भारत मिशनच्या नावाखाली महापालिकेची तिजोरी ‘स्वच्छ’? 600 टन टिपिंग फी दिली जात असताना प्रशासन 875 रुपये टिपिंग फीचा प्रस्ताव मान्य करणार !