पुणे : Pune Crime News | नात्यातील एका तरुणाने दोन अल्पवयीन मुलींसोबत अश्लील वर्तन करुन लैंगिक छळ (Sexual Assault) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पीडित मुलींच्या 35 वर्षीय आईने मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) सोमवारी (दि.4) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन मुबारक बंदेनवाज खोडती (वय-20 रा. जमकंडी, कर्नाटक) याच्यावर आयपीसी 354अ, 354ब, पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
आरोपी फिर्यादी यांच्या पतीच्या मामाचा मुलगा आहे. फिर्यादी व त्यांचे पती बाहेर गेल्यानंतर त्यांच्या 11 आणि 9 वर्षीय अल्पवयीन मुली घरात होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्या मोठ्या मुलीला बेडरुमध्ये घेऊन गेला. त्याठिकाणी तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने त्याला नकार दिला. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या नऊ वर्षाच्या मुलीसोबत अश्लील वर्तन करुन विनयभंग केला. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत
लॉजवर नेऊन महिलेवर बलात्कार
महिलेला लॉजवर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याप्रकरणी घोरपडी गावात राहणाऱ्या 27 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन फैजल मोहम्मद तांबोळी (रा. वडगाव शेरी) याच्यावर आयपीसी 376/2/के/एन नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने फिर्यादी यांना हांडेवाडी येथील एका लॉजवर घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने फिर्य़ादी यांच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक खळदे करीत आहेत.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pune Crime News | व्यसनासाठी जमीन विक्रीचा तगादा लावणार्या भावाचा खून; शिरुरमधील घोडनदीच्या पात्रात सापडला होता मृतदेह, बीडमधून तिघांना अटक
Pune Crime News | तोंडावर लाल तिखट टाकून तरुणाच्या गळ्यावर वार, पुण्यातील आपटे रोडवरील घटना
Pune Crime News | पुणे : गाडीला कट मारल्याच्या कारणावरुन दोन टोळक्यांमध्ये सार्वजनिक रोडवर राडा; 7 जणांना अटक
Maharashtra Police Suicide News | गळफास घेऊन पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या, प्रचंड खळबळ