पिंपरी : Pune Crime News | किरकोळ कारणावरुन चार जणांनी एका महिलेच्या डोक्यात विट मारुन जखमी केले. महिलेला वाचवण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना देखील मारहाण केल्याची घटना भोसरी येथे घडली आहे. ही घटना रविवारी (दि.4) रात्री साडे अकराच्या सुमारास भोसरी येथील शांतीनगर झोपडपट्टी येथे घडली. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
याबाबत एका महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) सोमवारी (दि.5) फिर्याद दिली आहे. यावरुन दोन महिला, यासीन शेख (वय-23), एक अल्पवयीन मुलगा (सर्व रा. शांतीनगर झोपडपट्टी, भोसरी) यांच्यावर आयपीसी 324, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या शेजारी राहतात. आरोपी यासीन याने फिर्यादी यांनी घरासमोर दारात मांडलेली विटांची चुलीला लाथ मारली. तसेच भरलेली पाण्याची बादली सांडली. त्यावेळी फिर्यादी यांनी आरोपीला जबा विचारला. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्य़ादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तर यासीन याने फिर्य़ादी यांच्या डोक्यात वीट मारुन जखमी केले. यावेळी महिलेच्या मदतीसाठी त्यांची सासु व दीर आले. आरोपींनी त्यांनाही मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
ACB Trap News | एक कोटीची लाच मागणाऱ्या सहायक राज्यकर आयुक्तांवर एसीबीकडून FIR
Pune Fire News | महंमदवाडी येथील इमारतीच्या 11 व्या मजल्यावर भीषण आग (Video)
ACB Trap News | आदिवासी व्यक्तीकडून लाच स्वीकारताना लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
PMC Recruitment Civil Engineer | पुणे महापालिका : सिव्हिल इंजिनियर पदाच्या 113 जागांसाठी 29 हजार 924 अर्ज
Pune Crime News | नात्यातील मुलाकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, कोंढवा परिसरातील घटना