पुणे : Pune Lok Sabha | पुणे लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. मतदार मतदान केंद्रावर जाऊन उत्साहात मतदान करत आहेत. यामध्ये पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुण-तरुणींची संख्या जास्त आहे. मात्र, फस्ट टाईम वोट करणाऱ्या एका तरुणीला बोगस मतदानाचा अनुभव आला आहे. ही तरुणी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेल्यानंतर तुमच्या नावावर यापूर्वीच कोणीतरी मतदान केल्याचे तिला सांगण्यात आले. हे ऐकताच तिची तळपायाची आग मस्तकात गेली. हे असे केसे होऊ शकते माझं पहिलच मतदान आहे, असे म्हणत तिने संताप व्यक्त केला आहे. त्यावेळी तेथील अधिकाऱ्यांनी तिला अर्ज भरून तुम्ही मतदान करु शकता असे सांगितले. मात्र, तिने निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले.
गौतमी पवार असे या तरुणीचे नाव आहे. कोथरुड येथील थोरात उद्यानातील मतदान केंद्रात तिचे मतदान होते. त्यासाठी 11 च्या सुमारास मतदान केंद्रात आली. मतदानाची स्लिप घेऊन ओळखपत्र घेऊन ती मतदान केंद्रात गेली असता तिच्या नावावर मतदान झाल्याचे सांगण्यात आले. हे ऐकून तिला धक्का बसला. (Pune Lok Sabha)
गौतमी म्हणाली, माझे यावेळेस पहिल्यांदाच मतदान होणार होते. यासाठी मी उत्साहाने थोरात उद्यानातील मतदान केंद्रावर आले. मतदान केंद्रावर गेल्यावर माझ्या नावावर कोणीतरी आधीच मतदान करुन गेल्याचे समोर आले. माझ्या नावाने बोगस मतदान झाल्याने मला प्रचंड राग आलेला आहे.
आम्ही एवढ्या उत्साहाने मतदान करण्यासाठी यायचे आणि कोणीतरी दुसरेच मतदान करुन जाणार,
त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. फॉर्म नंबर 17 भरुन मतदान करा असे मला संगितले.
ते मी करेनही पण अशा पद्धतीने बोगस मतदान कसे झाले याचा विचार प्रशासन करणार आहे की नाही.
हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे गौतमी पवार हिने सांगितले.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड
Pune Collector Dr Suhas Diwase | मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात (मोबाईल, कॉडलेस फोन,
पेजर, वायरलेस फोन वर बंदी) प्रतिबंधात्मक आदेश (Video)