पुणे : Firing On Sharad Mohol In Kothrud Pune | कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोथरूड परिसरातील सुतारदर्यात गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये जखमी झालेल्या मोहोळचा मृत्यू झाला असून आता त्याच्यावर गोळीबार करणार्याचे नाव निष्पन्न झाले आहे. शरद मोहोळसोबत असणार्यांनीच त्याच्यावर गोळीबार केल्याचं पोलिसांनी सांगितलं असून त्यापैकी एकाच नाव समोर आलं आहे. (Firing On Sharad Mohol In Kothrud Pune)
साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर (रा. सुतारदरा, कोथरूड) याने आणि त्याच्या इतर साथीदारांनी शरद मोहोळवर गोळीबार केलेला आहे. मोहोळ याच्यावर त्याच्यासोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनीच गोळीबार केल्यामुळे आर्श्चय व्यक्त करण्यात येत आहे. गोळीबाराचं नेमकं कारण काय याचा तपास पोलिस करीत आहेत. (Firing On Sharad Mohol In Kothrud Pune)
दरम्यान, मोहोळवर गोळीबार झाल्यानंतर त्याला उपचारासाठी सर्वप्रथम कोथरूड येथील सह्याद्री हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले होते तेथून त्याला ससून हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आला. उपचारादरम्यान मोहोळला मयत घोषित करण्यात आलं आहे. दरम्यान, मोहोळच्या समर्थकांनी आणि नातेवाईकांनी ससून रूग्णालयात प्रचंड गर्दी केली होती. दरम्यान, गुन्हयात निष्पन्न झालेल्या आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. आर्थिक आणि जमिनीच्या वादातून शरद मोहोळ याचा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात समोर येत आहे.