धुळे : ACB Trap Case | प्रवास भत्त्याची बीले बँक खात्यात जमा केल्याच्या मोबदल्यात एकूण बीलाच्या 10 टक्के लाच मागून त्यापैकी 54 हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय, पिंपळनेर ता. साक्री येथील महिला बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याला धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. शुभांगी बनसोडे (वय 39) असे लाच घेताना पकडलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. (Dhule Bribe Case)
याबाबत 51 वर्षीय महिलेने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारदार व त्यांच्या इतर सहा कर्यालयीन सहकारी असे सर्वांचे 9 लाख 37 हजार 533 रुपये एकत्रित प्रवास भत्त्याचे बिल मंजूर होऊन प्रत्येकाच्या बँक खात्यात जमा केले होते. त्या मोबदल्यात शुभांगी बनसोडे यांनी तक्रारदार व त्यांच्या सहकारी कर्मचारी यांना त्यांच्या कक्षात बोलावून प्रवासभत्ता काढून दिल्याच्या मोबदल्यात प्रत्येकाकडून 10 टक्के प्रमाणे 93 हजार रुपये जमा करुन आणून देण्यास सांगितले. याबाबत तक्रारदार महिलेने धुळे एसीबीकडे तक्रार केली. (ACB Trap Case)
प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता शुभांगी बनसोडे यांनी 93 हजार 753 रुपये लाच मागून पहिला 54 हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने सापळा लावला. शुभांगी बनसोडे यांना त्यांच्या कक्षात लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. शुभांगी बनसोडे यांच्यावर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी,
पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील,
पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी पोलीस अंमलदार राजन कदम, मुकेश अहिरे,
प्रशांत बागुल, चालक जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : शेअर मार्केट ट्रेडिंगचे आमिष दाखवून महिला डॉक्टरची 11 लाखांची फसवणूक