नागपूर : Aba Bagul Meets Devendra Fadnavis | पुण्यात काँग्रेसने लोकसभेसाठी (Pune Lok Sabha) आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी दिल्यानंतर अनेक नेते नाराज झाले होते. ही नाराजी त्यांनी उघडपणे बोलून दाखवली होती. नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न देखील झाले, मात्र हे प्रयत्न यशस्वी ठरले नसल्याचे दिसत आहे. कारण काँग्रेसचे पुणे शहरातील नाराज ज्येष्ठ नेते आबा बागुल हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेल्याने हा काँग्रेससाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
काँग्रेसचे पुण्यातील नाराज नेते आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची भेट घेतली आहे. रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्याने नाराज असलेल्या आबा बागुल यांनी पक्ष कार्यालयासमोर आंदोलनही केले होते.
यानंतर आबा बागुल हे भाजपा (BJP Leader) नेत्यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात होते. आता बागुल हे फडणवीस, बावनकुळे यांच्या भेटीला गेल्याने पुण्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. ऐननिवडणुकीत बागुल यांनी हा पवित्रा घेतल्याने आता ते भाजपात प्रवेश करणार का, रवींद्र धंगेकर यांना याचा निवडणुकीत फटका बसणार का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पुण्यात भाजपाकडून मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) निवडणूक रिंगणात आहेत, तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचितने वसंत मोरे यांना उमेदवारी दिली आहे. आता काँग्रेसमधील नाराजी नंतर सध्या ज्या घडामोडी घडत आहेत, त्या पाहता मुरलीधर मोहोळ यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आबा बागुल हे जुनेजाणते नेते असून ते शहराचे उपमहापौर होते.
धंगेकरांच्या उमेदवारीनंतर काय म्हणाले बागुल…
धंगेकर यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर आबा बागुल
यांनी आपली नाराजी तीव्र शब्दात उघडपणे व्यक्त करताना म्हटले होते
की, पुण्याची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निष्ठावंत लोकांना धक्का बसला आहे.
त्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा आहे. खरंतर ही निष्ठावंत लोकांची हत्या म्हणायला पाहिजे.
४० वर्ष काम करणाऱ्यांना तिकीट दिले नाही. आता आलेल्यांना तिकीट दिले. ते शिवसेनेतून मनसेत गेले,
तिथून काँग्रेसमध्ये आले. कसबा पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली. त्यांना आम्ही मेहनत करून निवडून आणले.
आता लोकसभेसाठी बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, उल्हास पवार
मी असे अनेक कार्यकर्ते असताना पक्षाने काय निकष लावून धंगेकरांना तिकीट दिले माहित नाही,
अशा शब्दात आबा बागुल यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Murlidhar Mohol | ‘हे संकल्पपत्र म्हणजे विकसित भारताचे स्वप्न गाठण्याचा रोडमॅप’ – मुरलीधर मोहोळ
Pune Crime | पुणे : कुत्रे अंगावर धावून आल्याने वाद, तरुणाला बांबू व रॉडने मारहाण