पुणे : Rohit Pawar On Baramati Lok Sabha | बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अजित पवारांकडून जे कोणी उमेदवार असतील, त्यांच्याबाबत अजित पवारांकडून ९ सर्व्हे करण्यात आले आहेत. त्या सर्व्हेमध्ये अजित पवार यांचे उमेदवार पिछाडीवर आहेत. तर सुप्रिया सुळे (Supriya Sule) या त्यांच्या सर्व्हेमध्ये आघाडीवर आहेत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) आमदार रोहित पवार यांनी केला. सुनेत्रा पवारांच्या (Sunetra Pawar) नावाची अधिकृत घोषणा अद्याप का नाही? असे देखील ते म्हणाले. बारामती लोकसभा मतदारसंघातील हवेली तालुक्यातील भेकराईनगर (Bhekrai Nagar) भागात आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते.
आमदार रोहित पवार पुढे म्हणाले, त्यामुळे आता अजित पवार पुन्हा एकदा म्हणजेच दहावा सर्व्हे करतील आणि योग्य असा निर्णय घेतील. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे या किमान अडीच लाख मताधिक्यानी निवडून येतील, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.
भाजपावर टीका करताना रोहित पवार म्हणाले, भाजपने देशात आणि राज्यात पक्ष, कुटुंब फोडाफोडीची जी कार्यपद्धती अवलंबली आहे, त्यावर भाजपचे अनेक नेते नाराज आहे. तसेच मतदार सुद्धा मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत. यामुळे एकूणच परिस्थिती बघता, भाजपला त्यांचाच मतदार मतदान करणार नसल्याचे दिसून येत आहे.
आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांच्या पक्षप्रवेशाबाबत रोहित पवार म्हणाले,
निलेश लंके हे अजित पवारांकडे होते. मतदार संघातील नागरिक लंके यांना भेटून सांगत होते की,
जर तुम्ही साहेबांसोबत असाल तर आम्ही तुम्हाला मतदान करू,
त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा बोलून दाखवली आणि आता निलेश लंके हे साहेबांसोबत आले.
आता त्यांचे मताधिक्य चांगलेच असेल.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
SP College Ramabai Hall | पुणे : शिवजयंती मिरवणुकीतील वादातून तरुणावर चाकुने वार
Prakash Ambedkar | इतरांना सोबत घेऊन नवी आघाडी; प्रकाश आंबेडकर यांची घोषणा