बुधवारी 19 आस्थापनांवरील कारवाईत 56 हजार चौ. फूट अतिक्रमण जमीनदोस्त
पुणे- PMC Action On Unauthorized Pubs-Bars-Hotels In Pune | महापालिकेच्या बांधकाम विभागाच्यावतीने सलग दुसर्या दिवशी शहरातील विविध भागातील हॉटेल्स, बारच्या साईड आणि फ्रंट मार्जिनमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. आज एकोणीस ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल ५६ हजार चौ.फूट क्षेत्र रिकामे करण्यात आले.
महापालिकेच्यावतीने आज बाणेर येथील द कॉर्नर लाउंज बार, एमएल सिटोबार, ईस्को बार, इलीफ्ट बार, ब्रीव्ह मर्चंट कॅफे, उरबो किचन बार, नेटीव बार, द ज्यॉईस बॉय, फिलेमिट बार, बाणेर थ्रीमिस्टेक टर्स, मनाली बार, डॉक यार्ड, कोरेगाव पार्क येथील ग्रेडमामस, पार्क डाबा शाब, निरंजन कवडे, प्रेम रेस्टॉरंट, टल्ली बार, शिवाजीनगर येथील फर्ग्युसन रस्त्यावरील सोशल हॉटेल आणि हडपसर सासवड रस्त्यावरील एका हॉटेलचा यामध्ये समावेश आहे. मागील दोन दिवसांत पालिकेने जवळपास ९२ हजार ९०६ चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम आणि शेडस् पाडले आहेत. (PMC Action On Unauthorized Pubs-Bars-Hotels In Pune)
महिन्याभरापुर्वी कल्याणीनगर येथे पब बाहेर झालेल्या पोर्शे कार अपघातानंतर नुकतेच फर्ग्युसन रस्त्यावरील थ्री एल पबमध्ये मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या पार्टीमध्ये मद्यासोबतच अंमली पदार्थांचे सेवन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तत्पुर्वी चार महिन्यांपुर्वी ससून मध्ये उपचारासाठी दाखल असलेला ड्रग्ज तस्कर ललित पाटील हा रुग्णालयातूनच ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याचे उघडकीस आले होते. विरोधकांनी हे मुद्दे उचलून धरल्यानंतर भानावर आलेल्या राज्य शासनाने पोलिस, महापालिका आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला बेकायदा पब आणि बारसह हॉटेल्सवर कारवाईचे आदेश दिले आहेत. फर्ग्युसन रस्त्यावरील पबमधील घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंत्रणेला बेकायदा पब आणि हॉटेल्सला बुलडोझर लावा असे कडक आदेश दिले. यामुळे एरव्ही कारवाईसाठी बंदोबस्त देण्यास टाळाटाळ करणार्या पोलिस प्रशासनाने स्वत:हून पालिकेला कारवाई कोठे करायची अशी विचारणा करत बंदोबस्त देण्यास सुरूवात केल्याने कारवाईला गती मिळाली आहे.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Ajit Pawar NCP MLA On Mahayuti | …तर आम्हाला विधानसभा निवडणूक वेगळी लढवावी लागेल;
अजित पवार गटाचा महायुतीला इशारा
Pubs In Pune | फक्त 23 पब आणि डिस्कोना आहेत आवश्यक परवाने ! माहिती अधिकारात झाले उघड
IRCTC Online Ticket Booking | ऑनलाईन बुक करता येणार नाही नातेवाईकांचे ट्रेन तिकिट,
IRCTC ने सांगितले काय आहे सत्य
State Excise Department Pune | थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु! 69 परवाने निलंबित तर 6 कायमचे रद्द,
उत्पादन शुल्कची 17 पथके तपास करणार