पुणे : Bhide Wada Smarak | महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरु केलेली भिडे वाडा येथील पहिली मुलींची शाळा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी पालिकेने साडेआठ कोटींचे पूर्वगणनपत्रक तयार केले आहे. या पूर्वगणनपत्रकाला इस्टिमेट कमिटीने मंजुरी दिली आहे. या स्मारकासाठी दोन दिवसात निविदा काढली जाणार आहे. असे पुणे पालिकेच्या भवन रचना विभागाचे मुख्य अभियंता युवराज देशमुख (Chief Engineer Yuvraj Deshmukh) यांनी सांगितले.
भिडे वाड्याचे स्मारक, तळमजला अधिक तीन असे चार मजल्याचे उभारण्यात येणार आहे. तळघरात दुचाकी पार्किंग असेल तळमजल्यावर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे असणार आहेत. पहिल्या मजल्यावर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य विविध भाषांमध्ये चलचित्रांच्या मार्फत पाहण्याची, ऐकण्याची सुविधा निर्माण करण्यात येईल. त्यावरील मजल्यावर ग्रंथालय आणि महिला सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याची व्यवस्था करण्यात येईल. (Bhide Wada Smarak)
या स्मारकासाठी साडेआठ कोटीचे पूर्वगणनपत्रक तयार केले आहे.
पालिकेच्या इस्टिमेट कमिटीमध्ये या पूर्वगणन पत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे.
या स्मारकासाठी दोन दिवसात निविदा काढली जाणार आहे,
अशी माहिती भवन रचना विभागाचे मुख्य अभियंता युवराज देशमुख यांनी दिली.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pubs In Pune | फक्त 23 पब आणि डिस्कोना आहेत आवश्यक परवाने ! माहिती अधिकारात झाले उघड