![Mahaganpati Ranjangaon](https://i0.wp.com/marathi.pune.news/wp-content/uploads/2024/06/Mahaganpati-Ranjangaon.webp?fit=1024%2C576&ssl=1)
शिक्रापूर : (सचिन धुमाळ) – Mahaganpati Ranjangaon | अष्टविनायकापैकी एक असलेल्या रांजणगाव महागणपती येथे अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव गणपती देवस्थानच्या वतीने अर्थवशीर्षपठण आयोजन करण्यात आले. यावेळी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिर गाभा-यासह परिसरात विविधरंगी फुलांची सजावट करण्यात आली होती. यावेळी देवस्थानच्या वतीने सामुहिक आरतीचे आयोजन करण्यात आले होते. देवस्थानच्या वतीने भाविकांना दर्शनासाठी दर्शनरांगेचे व्यवस्था करण्यात आली होती. पहाटे पासूनच गर्दी केली होती. शेकडो जणांनी सहभाग घेत अर्थवशीर्षपठण केले. यावेळी येणाऱ्या भाविकांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे. (Mahaganpati Ranjangaon)
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pune Drugs Case | पुणे L3 – Liquid Leisure Lounge ड्रग्ज पार्टी प्रकरण :
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखी एका निरीक्षकाचे निलंबन; आतापर्यंत 6 जणांवर कारवाई