पुणे : Wanwadi Pune Crime News | महिला डॉक्टरच्या क्लिनिक मध्ये येऊन एका मानसोउपचार तज्ञ असलेल्या डॉक्टरने असभ्य वर्तन करुन विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे (Molestation Case). हा प्रकार ऑगस्ट 2023 ते 17 मे 2024 या कालावधीत महिलेच्या क्लिनिकमध्ये घडला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी आरोपी डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत 46 वर्षीय महिला डॉक्टरने शुक्रवारी (दि.17) वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन मानसोपचार तज्ञ वर एएफएमसी मधील प्रोफेसर (Professor at AFMC) कर्नल डॉ. प्रतीक यादव (Colonel Dr. Prateek Yadav) यांच्यावर आयपीसी 354, 354(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना तु माझ्या सोबत चुकीचे केले आहे, मी तुझा डॉक्टर आहे. तु माझ्यावर विश्वास ठेवत नाही व माझ्यावर चुकीचे आरोप करते असे बोलून फिर्य़ादी यांना जवळ ओढून जबरदस्तीने मीठी मारुन किस केला. (Pune Crime News)
आरोपी फिर्य़ादी यांच्या क्लिनिकमध्ये आला असता फिर्यादी त्याला म्हणाल्या,
मी तुझ्या क्लिनीकमध्ये आल्यानंतर तु नॉर्मल वागतो आणि माझ्या क्लिनीकमध्ये आल्यानंतर माझ्यासोबत गैरवतर्तन करतो
याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादी यांच्यासोबत अश्लील वर्तन केले.
तसेच अश्लिल हावभाव करुन व बोलून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Maharashtra Weather Update | आज ‘या’ चार जिल्ह्यात वादळासह गारपीट, पुण्यात कसे असेल हवामान?