मुंबई : Mihir Kotecha | महायुतीच्या उमेदवारांनी (Mahayuti BJP Candidate) मतदारांना पैसे वाटल्याच्या आरोपावरून यापूर्वी बारामती (Baramati Lok Sabha) आणि अहमदनगरमध्ये (Ahmednagar Lok Sabha) तक्रारी दाखल झाल्या आहेत. आता मुंबईतदेखील असाच प्रकार घडला आहे. मुंबईतील मुलुंड (Mulund) येथे भाजपा उमेदवार मिहीर कोटेचा यांनी मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करत ठाकरे गटाच्या (Shivsena UBT) कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर राडा केला. या प्रकारानंतर कोटेचा यांच्या कार्यालयात जाऊन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घटनेची माहिती घेतली.
कोटेचा यांच्या कार्यालयाजवळ पैसेवाटप सुरू असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला. यानंतर ठाकरे गटाचे संतप्त कार्यकर्ते येथे जमा झाल्यानंतर भाजप कार्यकर्तेही जमा झाले. त्यावरून दोन्ही बाजूकडून घोषणाबाजी, धक्काबुक्की झाली. यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना शांत केले.
मुलुंडमध्ये बीपी सिंग रोडवरील वसुदा अपार्टमेंटमध्ये भाजपच्या वॉररूम मध्ये मोठ्या प्रमाणात पैसे असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) कार्यकर्त्यांनी केला. तसेच या इमारती बाहेर राडा केला. या वेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. दोन्ही बाजुकडील कार्यकर्ते जमा झाल्याने प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
दरम्यान, पोलिसांनी संबंधित ठिकाणी पैसे मिळाले नसल्याचे सांगितले. या प्रकारावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणले, मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयात पैसे वाटप केले जात होते. आमच्या लोकांनी पोलिसांना बोलावले. पण पोलीस आले नाहीत. या प्रकरणाचे फुटेज आहे ते बघा.
आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले, निवडणूक आयोग त्यांचे काम करत नसल्याने असे प्रकार घडत आहेत.
त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावे लागते. पुण्यात देखील असा प्रकार घडला होता.
त्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आंदोलनाला बसले होते.
दरम्यान भाजपा नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देताना म्हटले
की, संजय पाटील (Sanjay Dina Patil) यांना त्यांचा पराभव दिसू लागल्याने अशा प्रकारचा हल्ला त्यांनी केला.
हे सहन केले जाणार नाही. खोट्या तक्रारी करुन महिलांवर हल्ला करण्याचा जो प्रकार घडला आहे
त्याचा आम्ही निषेध करतो. ज्या पद्धतीने गुंड प्रवृत्तीचे उमेदवार दिले आहेत,
ज्यांच्याबरोबर गुंड प्रवृत्तीचे लोक फिरत आहेत.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Maharashtra Weather Update | आज ‘या’ चार जिल्ह्यात वादळासह गारपीट, पुण्यात कसे असेल हवामान?