महाबळेश्वर : Vishal Agarwal – MPG Club Mahabaleshwar | पुणे पोर्शे कार प्रकरणातील (Porsche Car Accident Pune) अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्या अडचणीत चांगल्याच वाढल्या आहेत. विशाल अग्रवाल यांचे महाबळेश्वर येथे शासकीय मिळकतीमध्ये आलिशान हॉटेल असून, याठिकाणी विनापरवाना बांधकाम व बार असल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) विशाल अग्रवाल याच्या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर बारला सील ठोकले. यानंतर शनिवारी (दि.8) यावर बुलडोझर चालवण्यात आला.
अग्रवाल याच्या महाबळेश्वर येथील एम पी जी क्लब नावाच्या रिसॉर्टवर आज (शनिवारी) बुलडोझर फिरवण्यात आला. रहिवाशी भाडेपट्टीवर असलेल्या या जागेचा वाणिज्य करण्यासाठी वापर होत असल्याचे आढळून आले होते. यानंतर हा एम पी जी क्लबवर प्रशासनाने टाळे ठोकले होते. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेतल्यानंतर या जागेवर उभारण्यात आलेल्या 12 अनधिकृत खोल्या जमिनदोस्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. शनिवारी सकाळीच महाबळेश्वर नगरपालिकेने अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली.
गावी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्य़ंत अग्रवाल कुटुंबाच्या महाबळेश्वर येथील अनधिकृत बांधकामाचे प्रकरण पोहचले. मध्यमांनी यासंदर्भात विचारणा केली असता या हॉटेलची चौकशी करुन तातडीने कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांना दिले होते. त्यानुसार यावर सुनावणी घेऊन जिल्हाधिकारी यांनी कारवाईचे आदेश दिले होते.
अग्रवाल याच्याकडे असलेल्या शासकीय मिळकतीची मूळ मालकी, वापर,
बांधकाम परवाना, बार, स्पा यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केली. दरम्यान,
या हॉटेलमधील बार बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने
तातडीने कारवाई करुन पुढील चौकशीसाठी हॉटेलमधील बारला सील ठोकले होते.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
India Alliance | ‘गेम नॉट ओव्हर, वेट’ इंडिया आघाडीच्या ट्विटमुळे खळबळ
Pune Crime News | पुणे : किरकोळ कारणावरुन पोलीस कर्मचाऱ्याकडून रॉडने मारहाण, गुन्हा दाखल (Video)