पुणे : Vinod Tawde On Sharad Pawar | शरद पवारांनी सुनेबद्दल बोलणे हा शाहू फुले आंबेडकरांच्या (Shahu Phule Ambedkar) महाराष्ट्रातील प्रचार नाही. शरद पवारांसारख्या जेष्ठ राजकीय नेत्याकडून अशी अपेक्षा नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे (BJP) राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिली. तसेच शिवसेना नेते संजय राऊत अमरावतीच्या उमेदवाराबद्दल जे बोलले आहेत, त्यावरून प्रचाराची पातळी समजते, असेही तावडे म्हणाले. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
देशभरात सुरू असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अंदाजाबाबत विनोद तावडे म्हणाले, देशात एनडीएच्या जास्त जागा येतील. बंगाल, तामिळनाडू केरळमध्ये जागा वाढणार आहेत. तर उत्तर प्रदेशमध्ये ७० पेक्षा जास्त जागा येतील. देशात एनडीए जास्त जागांवर निवडून येतील, आणि जे देशात तेच राज्यात होईल, असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला. (Vinod Tawde On Sharad Pawar)
फडणवीस (Devendra Fadnavis) सुडाचे राजकारण करतात, असा आरोप होतो, या प्रश्नावर तावडे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी कधीच सुडाचे राजकारण केले नाही. ज्यांनी जनतेशी गद्दारी केली त्याना धडा शिकवला पाहिजे.
एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा भाजपा प्रवेश का रखडलाय,
त्यांच्या प्रवेशाला पक्षांतर्गत कोणाचा विरोध आहे, या प्रश्नावर तावडे म्हणाले,
खडसेंच्या पक्षप्रवेशाला कुणाचाही विरोध नाही.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Shaina NC In Pune | मोदी सरकारने राबविलेल्या धोरणांमुळे देशाचा विकास आणि महिलाशक्ती सक्षम झाली
– भाजप राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन. सी.