शिवाजीनगर न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच रात्री 12.30 वाजता सुनावणी
पुणे : Pune Crime News | पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) मधील सेवा विकास बँकेतील (Seva Vikas Bank Pimpri) कोट्यवधी रुपयांच्या कर्ज गैरव्यवहार प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (Pune CID) रोझरी स्कूलचा (Rosary School Pune) संचालक विनय अरहानासह (Vinay Aranha Arrest) अॅड. सागर सूर्यवंशी (Adv Sagar Suryavanshi) याला अटक केली आहे. सीआयडीने कर्ज गैरव्यवहारत ईडीकडून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करुन दोघांना गुरुवारी (दि.28) रात्री अटक केली. दोघांना मध्यरात्री शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात (Shivaji Nagar Court) हजर करण्यात आले. शिवाजीनगर न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच रात्री 12.30 वाजता सुनावणी झाली.
आरहाना याला आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून Enforcement Directorate (ED) अटक करण्यात आली होती. सेवा विकास बँकेतील कर्ज गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. अरहाना याच्या विरोधात दोन फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन गुन्हे रद्द करण्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयाने गुन्हे रद्द करुन त्याला दिलासा दिला होता. परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर सीआयडीला तपासाबाबत परवानगी दिली होती.
सीआयडीच्या पथकाने अरहाना आणि ॲड. सूर्यवंशीची चौकशी करुन त्यांना अटक केली. दोन्ही आरोपींना रात्री उशिरा विशेष न्यायालयापुढे हजर करण्यात आले. विशेष न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास सुनावणी घेऊन दोन्ही आरोपींना चार एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
सेवा विकास बँकेची मुख्य शाखा पिंपरी येथे आहे. शाखेच्या 25 शाखा असून 2010 आणि 2020 या कालावधीत बँकेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार आरबीआय कडे करण्यात आली. आरबीआयने तक्रारीची गंभीर दखल घेतली. गैरव्यवहार प्रकरणात संचालकांना अटक करुन बँकेवर प्रशासकाची नियुक्ती केली. लेखापरीक्षक मार्फत आरबीआय कडे अहवाल सादर करण्यात आला होता.
त्यानुसार पिंपरी पोलिसांनी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली.
चौकशीत बँकेत 429 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले.
ईडीने या प्रकरणात बँकेचे अध्यक्ष अमर मूलचंदानी याच्यासह इतर आरोपींची चौकशी केली होती.
त्यांना या प्रकरणात अटक केली होती.
विनय अरहाना आजारपणाचा बहाणा करुन येरवडा कारागृहातून ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाला.
त्याठिकाणी त्याची ओळख ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्यासोबत झाली.
त्याला ससून मधून पळून जाण्यास अरहाना याने मदत केल्याचे तपासात समोर आले.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
SP College Ramabai Hall | पुणे : शिवजयंती मिरवणुकीतील वादातून तरुणावर चाकुने वार
Prakash Ambedkar | इतरांना सोबत घेऊन नवी आघाडी; प्रकाश आंबेडकर यांची घोषणा