तळेगाव दाभाडे : Talegaon Dabhade Nagar Parishad CEO | तळेगांव दाभाडे नगरपरिषद मुख्याधिकारी एन के पाटील (NK Patil) यांनी तळेगाव येथे एका गाडीला ठोकर मारत अपघात केल्याची घटना शनिवारी (दि.1) घडली आहे. ही घटना तळेगाव दाभाडे शहरातील काका हलवाई दुकानासमोर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. (alegaon Dabhade Nagar Parishad CEO)
मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन.के. पाटील कार चालवत तळेगाव स्टेशन च्या दिशेने जात होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास काका हलवाई दुकानाजवळ आल्यानंतर त्यांनी रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या एका कारला धडक दिली. अपघातानंतर घरी जाऊन बसलेल्या एन.के. पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पाटील यांनी मद्यपान करुन गाडी चालवली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या चारचाकी गाडीचा नंबर MH13 EC 9633 असा असून या कार वर महाराष्ट्र शासन लिहिलेली पाटी देखील आहे.
पाटील यांनी मद्यापान केले होते का याची पडताळणी पोलीस करीत आहेत,
अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Monsoon Update-Pune Rains | मान्सून तळकोकणात 4 जूनला प्रवेश करणार; पुण्यात 6 जूनला ‘आनंद सरी’
ACB Trap On Mhada Project Manager | दोन लाख 70 हजार रुपयांची लाच घेताना पुण्यातील
म्हाडा कार्यालयातील प्रोजेक्ट मॅनेजर अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
Pune News | पोर्शे कार अपघातानंतर पालकांची चिंता वाढली, मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी पालकांकडून
खासगी गुप्तेहेरांची मदत