![Talegaon Dabhade Firing Case](https://i0.wp.com/marathi.pune.news/wp-content/uploads/2024/06/Talegaon-Dabhade-Firing-Case.webp?fit=1024%2C576&ssl=1)
पिंपरी : Talegaon Dabhade Firing Case | तळेगाव दाभाडे शहरात अंदाधुंद गोळीबार करत दहशत निर्माण करणाऱ्या तिघांसह सहा जणांच्या टोळक्याची तळेगाव पोलिसांनी तळेगाव परिसरातून धिंड काढली.
रोहन उर्फ चिक्या उत्तम शिंदे (वय 18, रा. कातवी रोड, तळेगाव स्टेशन), नीरज उर्फ दाद्या बाबू पवार (वय-19, रा. नेहरूनगर, पिंपरी), आदित्य नितीन भोईनल्लू (वय-21, रा. कामाठीपुरा, ता. शिरूर), विकी खराडे आणि अन्य दोघांना अटक केली. आरोपींना प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी वडगाव न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कस्टडीची रिमांड देण्यात आली असून अटक आरोपींकडून तपासात तीन गावठी पिस्तुले व 8 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
चिक्या शिंदे याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून ‘आम्ही इथले भाई आहोत आमच्या नादाला कोणी लागायचे नाही’ असे मोठमोठ्याने बोलून शिवीगाळ करत तळेगाव शहरातील गजानन चौक, शाळा चौक, राजेंद्र चौक, मारुती मंदिर चौक अशा ठिकाणी गोळीबार केला. आरोपींनी शहरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गोळीबार केल्याचे तपासात निष्पन्न झाले. गोळीबार केल्यानंतर आरोपी पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. गोळीबाराचा थरार रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास करत पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने मुख्य संशयित रोहन शिंदे, नीरज पवार, आदित्य भोईनल्लू यांना नाशिक येथून ताब्यात घेतले. आरोपींना पुढील कारवाईसाठी तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तर इतर तिघांना तळेगाव पोलिसांनी अटक केली.
पोलीस कोठडीत असताना संशयितांकडे तपास करत पोलिसांनी तीन गावठी पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे जप्त केली. त्यानंतर सोमवारी सायंकाळी सर्व आरोपींची तळेगाव दाभाडे शहरात धिंड काढली. ज्या परिसरात आरोपींनी गोळीबार करुन दहशत निर्माण केली होती, त्याच परिसरात आरोपींची धिंड काढण्यात आली.
ही कारवाई पोलीस आयुक्त सुनिल रामानंद, अपर पोलीस आयुक्त डॉ. वसंत परदेशी,
पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे
यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप,
हजरत पठाण, पोलीस अंमलदार प्रविण तापकिर, सोपान ठोकळ, विक्रम जगदाळे, गंगाराम चव्हाण,
गणेश मेदगे, विजय गंभिरे, सुनिल चौधरी, मयुर दळवी, नितीन गेंगजे, शाम बाबा, विजय तेलेवार,
शुभम कदम, रामदास मोहीते, ज्ञानेश्वर गिरी, तौसिफ शेख व TAW कडील नागेश माळी व पोपट हुलगे यांच्या पथकाने केली.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Ravindra Dhangekar On Pune Drugs Case | ‘ड्रग्स प्रकरणात पोलीस मास्टरमाईंड पर्यंत पोहोचणार नाहीत
कारण…’; आमदार धंगेकरांचा गंभीर आरोप