मुंबई : T20 World Cup 2024 Semi Final Ind vs Eng | भारतीय क्रिकेट टीम (Team India) २७ जूनला गुयानामध्ये इंग्लंडविरूद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात उतरणार आहे. यावेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) चा संघ विजयासह अंतिम फेरीत स्थान बनविण्याचा प्रयत्न करणार आहे. भारतीय संघ गटात आणि त्यानंतर सुपर-८ मध्ये यशस्वी ठरला होता. सुपर-८ साठी गट १ मधील टीम इंडियाने तिनही सामने जिंकून उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे.
दुसरीकडे इंग्लंड (England) ने सुपर-८ मध्ये दोन सामने जिंकले आणि या टी२० विश्वचषकात पोहचणारा पहिला संघ बनला. अशावेळी जेव्हा दोन्ही संघ एकमेकांविरूद्ध लढतील तेव्हा तो सामना रोमांचकारी असणार आहे. मात्र, क्रिकेट प्रेमींच्या आनंदावर पावसाचे पाणी पडू शकते, कारण सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारत-इंग्लंडमध्ये होत असलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्याच्या सुरूवातीपूर्वी पावसाची शक्यता आहे. हा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता सुरू होणार आहे आणि त्यापूर्वी गुयानामध्ये पावसाची शक्यता आहे. संपूर्ण सामन्यादरम्यान स्थानिक वेळेनुसार सकाळी १० पासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३० पासून सकाळी ३:३० वाजेपर्यंत) पावसाची ३५ ते ६८ टक्के शक्यता आहे. याशिवाय सामन्यादरम्यान ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.
सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस नसल्याने २७ जूनला पावसामुळे सामना झाला नाही तर सामना रद्द केला जाईल.
मात्र, आयसीसीने या सामन्यासाठी २५० अतिरिक्त मिनिटे ठेवली आहेत. अशावेळी सामन्याचे आयोजन करण्यास पूर्ण वेळ असेल.
संबंधितांचा प्रयत्न असेल की सामना खेळवला जावा. या सामन्यात निकालासाठी किमान १० षटके दोन्ही संघांनी खेळवीत असा नियम आहे.
सामना रद्द झाला तर…
जर सर्व प्रयत्नानंतर सुद्धा सामना होऊ शकला नाही आणि अखेरीस सामना रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला,
तर अशा स्थितीत याचा फायदा भारतीय संघाला होईल आणि तो न खेळता अंतिम फेरीत पोहोचू शकतो.
भारतीय संघ सुपर-८ गट -१ मध्ये टॉपवर होता, तर इंग्लंड सुपर-८ गट-२ मध्ये दुसऱ्या स्थानावर होता.
आयसीसीच्या नियमानुसार, जर उपांत्य फेरी रद्द झाली तर सुपर-८ मध्ये टॉप असलेला
भारतीय संघ थेट अंतिम फेरीत जाईल आणि गट-२ मध्ये दुसऱ्या स्थानावरील इंग्लंडचा संघ स्पर्धेबाहेर जाईल.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pubs In Pune | फक्त 23 पब आणि डिस्कोना आहेत आवश्यक परवाने ! माहिती अधिकारात झाले उघड