पुणे : Sushma Andhare On Shambhuraj Desai | पुणे शहरात मागच्या काही दिवसांपासून अनधिकृत पब, बार तसेच ड्रग्स प्रकरणे समोर येत आहेत (Pubs In Pune). दरम्यान आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena UBT) उपनेत्या सुषमा अंधारे सरकारवर निशाणा साधत आहेत. दरम्यान मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर धंगेकर आणि अंधारे गंभीर आरोप करीत आहेत (Pune Drugs Party). राज्य उत्पादन शुल्क विभागाचे (State Excise Department Pune) मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर आता अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
पत्रकारांशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, ” पुणे विद्येचे माहेरघर म्हटले जाते. पण आता याच पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा भोजवारा उडाला आहे. पब बारच्या संस्कृतीने सगळ्या तरुणाईला विळखा टाकलेला आहे. पुण्यात फक्त अधिकृत २३ पब बार आहेत. मग बाकीचे १०० पब बार कोणाच्या आशीर्वादने चालतात, असा थेट सवाल करत शंभुराज देसाई तुमच्या धमकीला मी घाबरत नाही. तुमच्या नोटिसा आम्ही डायपरसाठी वापरू, कुठल्या तोंडाने तुम्ही नोटिसा पाठवत आहात, आम्ही मागील १० महिन्यांपासून ड्रग्सच्या विरोधात आवाज उठवत आहोत. मग कारवाई का होत नाही” अशी विचारणा सुषमा अंधारे यांनी केली आहे.
पुढे त्या म्हणाल्या, ” पुण्यातील पब,बार बाबतची माहिती आमच्याकडे आहे. शंभुराज देसाई मंत्री म्हणून तुम्ही काय काम करता? चरणसिंग राजपूत या भ्रष्ट्राचारी अधिकाऱ्याचे निलंबन करून चौकशी झालीच पाहिजे”, अशी मागणी अंधारे यांनी यावेळी केली.
शंभुराज देसाई तुमच्या अधिकाऱ्यामुळे पुण्याची ओळख अंमली पदार्थ अशी होत आहे.
तुम्ही कारवाई केली नाही तर आम्हांला रस्त्यावर उतरायला लागणार नाही.
आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका, असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्याचे वाटोळे केले आहे.
चरणसिंग राजपूत आणि शंभूराजे देसाई यांच्यात काय नाते आहे, ते मला कळत नाही, अशी टीका अंधारे यांनी केली.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Maharashtra Weather Update | राज्यात पुढील 2 दिवसात अतिमुसळधार पाऊस; आयएमडी कडून धोक्याचा इशारा
Pune Swargate Metro | पुणेकरांसाठी खुशखबर! गणेशोत्सवात मेट्रोची स्वारगेट्पर्यंत धाव