![sppu](https://i0.wp.com/marathi.pune.news/wp-content/uploads/2024/01/sppu.webp?fit=1024%2C576&ssl=1)
पुणे : SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) जयकर ज्ञानस्त्रोत केंद्रात संशोधक व बाहेरील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या तात्पुरत्या सदस्यत्वाच्या सेवेमध्ये विस्तार होणार आहे. या सेवेचा कालावधी एक दिवस ते एक वर्षापर्यंत वाढवण्यात यावा, अशी शिफारस जयकर ज्ञानस्त्रोत समीतीने मा. कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केली होती. या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून लवकरच हा कालावधी वाढवण्यात येणार आहे. सध्या हा कालावधी १ ते ८ दिवसांपर्यंतच मर्यादित असून ही सुविधा सशुल्क व नियमांच्या अधिन सुरळीत सुरू आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जयकर ज्ञानस्त्रोत केंद्रात पुणे, नाशिक आणि नगर जिल्ह्यातील अनेक संशोधक विद्यार्थी संशोधनासाठी संदर्भ शोधण्यासाठी व आवश्यक साहित्य मिळविण्यासाठी येत असतात. या विद्यार्थ्यांना केंद्रातर्फे सशुल्क तात्पुरते सदस्यत्व देण्यात येते. या सदस्यत्वाचा सध्याचा कालावधी हा जास्तीत जास्त ८ दिवसांचा आहे. मात्र आता वेगवेगळ्या आवश्यकतेनुसार या सदस्यत्वाचा कालावधी विस्तारीत करण्याची शिफारस केंद्रातर्फे करण्यात आली होती. या शिफारसीनुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार १, ८, १५ दिवस, १, ३, ६ महिने तसेच १ वर्षापर्यंत हे सदस्यत्व घेता येईल. मा. कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जयकर ज्ञानस्त्रोत समीतीच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून केंद्रातर्फे लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालिका डॉ. अपर्णा राजेंद्र यांनी दिली. (SPPU News)
कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जयकर ज्ञानस्त्रोत समीतीच्या बैठकीत ग्रंथालयाच्या संबंधित अनेक समस्यांचा आढावा घेत चर्चा करण्यात आली.
यांमध्ये मा. कुलगुरू यांनी अनेक सुधारणा सुचवित या तात्पुरत्या सदसत्व सेवेचा विस्तार करण्याची मान्याता दिली आहे.
त्याची ग्रंथालयामार्फत लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
प्रा.(डॉ) विजय खरे
प्रभारी कुलसचिव
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pune Police Seized Firearms | पुणे पोलिसांकडून 42 पिस्तुल, 74 जिवंत काडतुसे जप्त; 28 गुन्हेगार गजाआड
Vishrambaug Pune Police | घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विश्रामबाग पोलिसांकडून अटक (Video)