मुंबई : Sharad Pawar On PM Narendra Modi | काल दिंडोरी (Dindori Lok Sabha) येथील जाहीर प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाकरे आणि पवारांच्या पक्षाचा उल्लेख नकली शिवसेना (Nakli Shivsena) आणि नकली राष्ट्रवादी (Nakli NCP) असा केला होता. या टीकेला आज शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. माझ्या बोलण्याचा मोदींना कसला त्रास झाला ते समजत नाही, असे पवार यांनी म्हटले आहे.
शरद पवार म्हणाले, मी असे सुचवलेले की, काँग्रेसची (Congress) विचारधारा जोपासणारे, काँग्रेसच्या विचारधारेवर चालणारे अनेक पक्ष आहेत. त्या समान विचारधारा असणाऱ्या पक्षांनी एकत्र येण्याचा विचार करायला हवा. तसे करणे खूप उपयुक्त ठरेल. हा माझा विचार होता. मात्र यामुळे मोदींना कसला त्रास झाला ते मला समजले नाही, असा टोला पवारांनी लगावला. (Sharad Pawar On PM Narendra Modi)
तर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले, राज ठाकरे नक्की काय म्हणाले ते काही मला माहिती नाही. त्याचबरोबर राज ठाकरे यांचे महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं स्थान काय आहे हे देखील मला माहिती नाही.
राज ठाकरे काय म्हणाले होते…
कल्याणच्या सभेत (Kalyan Lok Sabha) राज ठाकरे म्हणाले होते
की, शरद पवारांनी याआधी अनेक राजकीय पक्ष फोडण्याचं काम केलं आहे.
त्यामुळे आता त्यांचा पक्षदेखील फुटला आहे. याच टीकेला आज शरद पवार यांनी उत्तर दिले.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Prithviraj Chavan On Ajit Pawar NCP | अजित पवार गटाची एकही जागा निवडून येणार नाही,
शिंदे गटाच्या…, पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा
Pune Crime News | पुणे : बांधकाम व्यावसायिकाकडून तरुणीवर बलात्कार
Pune Weather Update | पुण्यात ऊन पावसाचा लपंडाव? पुढील चार दिवस विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता