नवी दिल्ली : Sharad Pawar NCP Vs Ajit Pawar NCP | आज संसदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांना शुभेच्छा देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित दादा गटाचे सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यात ओरिजनल राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची यावरुन जुगलबंदी पाहायला मिळाली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने एक्सवर एक पोस्ट करून सुनील तटकरेंना प्रत्युत्तर देत अजित पवारांनाही बारामतीमधील (Baramati Lok Sabha) पराभवाची आठवण करून देत डिवचले आहे.
संसदेतील सुनील तटकरेंच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना एक्सवरील पोस्टमध्ये शरद पवार गटाने म्हटले आहे की, फक्त तोंडाने बोलून कोण ओरिजनल होत नसतं. ब्रँड हा ब्रँड असतो. राष्ट्रवादी या ब्रँडला कॉपी करण्याची अनेकांना इच्छा असली तरी बारामती आणि शिरुरच्या जनतेने ओरिजनल ब्रँडची ओळख दाखवून दिली. जर तुतारी वाजवणारा माणूस रायगडमध्ये उभा केला असता तर संसदेत मागच्या दाराने घुसण्याची वेळ आली असती, असे म्हणत शरद पवार गटाने अजित पवार आणि तटकरे दोघांना चिमटा काढला आहे. यावरून दोन्ही गटांकडून आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत त्यांच्या भाषणाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसचे ओरिजनल संस्थापक आणि आमचे प्रिय नेते शरद पवार अशी केली. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व खासदारांच्यावतीने ओम बिर्ला यांना अध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या. (Sharad Pawar NCP Vs Ajit Pawar NCP)
खासदार सुप्रिया सुळे यांच्यानंतर अजित पवार गटाचे एकमेव खासदार सुनील तटकरेंनी त्यांच्या भाषणाची सुरुवात ओरिजनल राष्ट्रवादी काँग्रेस अशी केली.
या दोघांमधील जुगलबंदीचे पडसाद राज्यातील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमटताना दिसत आहेत.
यानंतर शरद पवार गटाने एक्सवर ही पोस्ट करत अजित पवार आणि तटकरेंना डिवचले आहे.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Ajit Pawar NCP MLA On Mahayuti | …तर आम्हाला विधानसभा निवडणूक वेगळी लढवावी लागेल;
अजित पवार गटाचा महायुतीला इशारा
Pubs In Pune | फक्त 23 पब आणि डिस्कोना आहेत आवश्यक परवाने ! माहिती अधिकारात झाले उघड
IRCTC Online Ticket Booking | ऑनलाईन बुक करता येणार नाही नातेवाईकांचे ट्रेन तिकिट,
IRCTC ने सांगितले काय आहे सत्य
State Excise Department Pune | थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु! 69 परवाने निलंबित तर 6 कायमचे रद्द,
उत्पादन शुल्कची 17 पथके तपास करणार