पुणे : Satara Lok Sabha Election 2024 | सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) मोठा गोंधळ सुरू होता. परंतु, आता या जागेचा तिढा सुटला असून राष्ट्रवादी काँग्रेसने येथील उमेदवाराचे नाव ‘एक्स’वरून जाहीर केले आहे. साताऱ्यातून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून (Sharad Pawar NCP) शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) निवडणूक लढणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रावेरमधून (Raver Lok Sabha) श्रीराम पाटील (Shriram Patil) यांची देखील उमेदवारी आज जाहीर केली आहे.
श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांनी नकार दिल्यानंतर सातारा येथून पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचे नावे देखील चर्चेत आले होते. मात्र, चव्हाण यांचे नाव मागे पडले होते. आता हा तिढा सुटला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. (Satara Lok Sabha Election 2024)
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली आहे. नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केलेले श्रीराम पाटील हे एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांच्याविरूद्ध लढणार आहेत.
दरम्यान, महायुतीचा साताऱ्यातील उमेदवार अधिकृतपणे जाहीर झालेला नाही.
येथून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
जर उदयनराजेंना येथून उमेदवारी मिळाली तर उदयनराजे विरूद्ध शशिकांत शिंदे असा सामना रंगणार आहे.
आज भाजपची नववी यादी जाहीर होणार असून त्यामध्ये साताऱ्याचा उमदेवार जाहीर होऊ शकतो.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Fruits for Blood Circulation | शरीरात भरपूर रक्त भरतील ‘ही’ 5 फ्रूट्स, रक्ताभिसरण सुद्धा होईल वेगाने,
प्लेटलेट्स काउंट वाढेल जलद
Sudhir Mungantiwar | मोदींसमक्ष केलेल्या ‘त्या’ वक्तव्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार,
मुनगंटीवारांची उमेदवारी रद्द करण्याची काँग्रेसची मागणी
Ajit Pawar On Supriya Sule | अजित पवारांच नवं संशोधन, सुप्रिया सुळेंवर टीका करताना म्हणाले,
”संसदेत भाषणं करून मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाहीत” (Video)