नवी दिल्ली : Sanjay Singh On Arvind Kejriwal Arrest | दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी असा कोणता गुन्हा केला आहे की त्यांना अटक करण्यात आली? याचे उत्तर भाजप (BJP) देईल का? सीबीआय (CBI) आणि ईडीच्या (ED) माध्यमातून विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. अरविंद केजरीवाल यांचा असा काय गुन्हा आहे की त्यांना जेलमध्ये ठेवले आहे? असे प्रश्न आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी भाजपाला केले आहेत. ते एका वृत्तसंस्थेशी बोलत होते.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात आज संसद संकुलाच्या गेटवर इंडिया आघाडीच्या नेत्यांची निदर्शने सुरू आहेत. यावेळी संजय सिंह यांनी भाजपावर प्रश्नांचा मारा केला आहे.
संजय सिंह म्हणाले, दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक चुकीची आहे. त्यामुळेच आम आदमी पार्टीसोबतच इंडिया आघाडीचे नेते निदर्शने करत आहेत.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना दिल्ली मद्य प्रकरणात १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणात त्यांचा उल्लेख मुख्य सूत्रधार म्हणून करण्यात येत आहे. त्यांची पुन्हा चौकशी होऊ शकते.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले
– ‘लखनऊमध्ये त्यांची 200 एकर जमीन पण मी फक्त…’
LPG Price Reduced | सिलेंडर झाला स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरात किती कमी झाला दर
July Rules Changed | आजपासून झाले ‘हे’ 7 मोठे बदल, क्रेडिट कार्डपासून LPGच्या दरावर झाला परिणाम!
Sukanya Samriddhi Yojana (SSY) | तुमची मुलगी होईल करोडपती,
केवळ ‘या’ योजनेत दरवर्षी करा 1 लाख रुपयांची गुंतवणूक!