पुणे : Ravindra Dhangekar On Excise Department | कल्याणीनगर अपघात प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहेत (Kalyani Nagar Accident). या अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने पैसे खाऊन बदलल्यामुळे पुणे पोलिसांनी (Pune Police) ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक केली आहे (Dr Ajay Taware – Dr Shrihari Halnor Arrest ). या अपघात प्रकरणात संबंधित अल्पवयीन मुलाला काही तासात जामीन मिळाल्यांनतर विविध स्तरातून रोष निर्माण झाला होता.
तसेच आता या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर अगरवाल कुटुंबाच्या विरोधात आणखी एक तक्रारदार समोर आला आहे.
पुणे अपघात प्रकरणात कारवाईस होत असलेल्या दिरंगाईमुळे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत पोलिसांनीच पैसे खाऊन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. (Ravindra Dhangekar On Excise Department)
आज काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma andhare) यांनी पुण्यातील उत्पादन शुल्क विभागाच्या (Pune Excise Department) कार्यालयावर धडक देत विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
यावेळी धंगेकरांनी ” तुम्ही खोटं बोलू नका. तुम्ही पापं करताय, तुम्हाला लय समजतं का, तुम्ही दर महिन्याला ७० ते ८० लाख हप्ता घेता, याची यादी माझ्याकडे. तुमचे कोण कोण लोक पैसे आणून देता, याची माहिती माझ्याकडे आहे. तुम्ही स्वत:ला शहाणे समजता का, तुम्ही पुणे उदध्वस्त केलं, तुम्हाला लाज कशी वाटत नाही?, ” अशा एकापाठोपाठ प्रश्नांची सरबत्ती करत विभागातील अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.
तसेच कॉन्स्टेबल सुर्वे, पडवळ, बाळासाहेब राऊत, राहुल रामनाथ, सुप्रिटेंड चरणसिंह रजपूत हे तुमच्या आशीवार्दाने हप्ते घेतात.
याचा जाब विचारण्यासाठी आलो असल्याचे धंगेकर यांनी सांगितले.
धंगेकरांच्या या आक्रमक पावित्र्यामुळे विविध यंत्रणेचे अधिकारी आता आणखी जोमाने कारवाई करतील असे बोलले जात आहे.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Ajit Pawar | अजित पवारांच्या रडारवर कोण? कोणाची जाणार खुर्ची, पदाधिकारी टेन्शनमध्ये…
Sharad Pawar | शरद पवारांना मोठा धक्का; दोन नेते साथ सोडणार?
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी अग्रवाल यांचे घर, बार,
अपघात स्थळाचे सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती, 100 फुटेजची तपासणी सुरू