पुणे : Pune Water Supply | खडकवासला जॅकवेल (पर्वती 500 एमएलडी) या ठिकाणी आज (शनिवार दि.29) सकाळी साडे सहाच्या सुमारास विद्युत पुरवठ्यासाठी असलेल्या 22 के व्ही पॅनेलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे पंपींग बंद झाल्याने पुणे शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे शहरातील काही भागात रात्री बारा वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून सायंकाळ पर्य़ंत तात्पुरती व्यवस्था करुन पंपीग यंत्रणा सुरु करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पालखी मार्ग व मुक्कामाच्या भागातील पाणीपुरवठा पुर्णवेळ सुरळीत ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती पुणे महानगरपालीकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. (Pune Water Supply)
दुरुस्ती कालावधीत खालील भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार
- पर्वती H.L.R. टाकी परिसर – सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, गंगाधाम परिसर
- SNDT H.L.R. टाकी – गोखलेनगर, कोथरुड परिसर, डहाणूकर कॉलनी, चतुश्रृंगी परिसर
- लष्कर जलकेंद्र – संपुर्ण हडपसर, रामटेकडी, सोलापूर रोड, कोरेगाव पार्क, महंमदवाडी, रेसकोर्स, कोंढवा परिसर, खराडी परिसर, येरवडा इत्यादी
- वडगाव जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत – संपुर्ण कात्रज, आंबेगाव, धनकवडी, केदारेश्वर टाकी परिसर, सुखसागरनगर, इत्यादी.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Baramati Firing Case | बारामती गोळीबार प्रकरण: जखमी झालेले रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू,
सोमेश्वर कारखान्याच्या माजी अध्यक्षांच्या मुलांनी झाडल्या होत्या गोळ्या