पुणे : Pune Rape Case | नात्यातील मुलीला लग्नाचे आमिष दाखवून मागील चार वर्षापासून वारंवार शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित केले. मुलीने लग्नाबाबत विचारणा केली असता लग्न करण्यास नकार देऊन फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police) एका तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सन 2020 ते 19 एप्रिल 2024 या कालावधीत घडला आहे.
याबाबत वाघोली (Wagholi) येथे राहणाऱ्या 24 वर्षीय पीडित तरुणीने रविवारी (दि.21) विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून खांदवेनगर (Khandve Nagar Lohegaon) येथे राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणावर आयपीसी 376/2/एन, 504,506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार लोहगाव परिसरातील लॉजवर घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकमेकांचे नातेवाईक आहेत. आरोपीने फिर्यादी यांना लोहगाव येथील एका लॉजवर नेऊन लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच मुलीला घरी बोलावून घेत तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केले. पीडीत तरुणीने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. तसेच शिवीगाळ करुन पोलीसांकडे तक्रार केली तर तुला व तुझ्या घरच्यांना बघून घेईन अशी धमकी दिली. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून मागिल चार वर्षापासून वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास विमानतळ पोलीस करीत आहेत.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pune Crime Branch | पुणे : सराईत वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड, 3 गुन्हे उघडकीस
Pune Firing Case | पुण्यात सलग चौथ्या दिवशी गोळीबार, येरवड्यात जुन्या वादातून तीन गोळ्या झाडल्या
Varunraj Bhide Award | पुण्यातील जेष्ठ पत्रकार शैलेश काळे, अरुण मेहेत्रे यांच्या सह समर खडस आणि
डी.के. वळसे पाटील यांना ‘वरुणराज भिडे पत्रकारिता पुरस्कार’ जाहीर