पुणे : Pune Porsche Car Accident Case | कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलिसांच्या कारवाईला मोठा वेग आलेला आहे. या अपघातील आरोपीला कडक शिक्षा व्हावी, यासाठी पुणे पोलीस (Pune Police) विविध पुराव्याची माहिती घेत आहे (Kalyani Nagar Accident). त्यातच आता या अपघाताची घटना ‘एआय’ द्वारे जिवंत करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
बिल्डर विशाल अगरवालच्या (Vishal Agarwal Builder) वकिलांनी पोर्शे कारमध्ये समस्या होती, असा दावा कोर्टात (Pune Shivaji Nagar Court) केला होता. याची तक्रारही कंपनीकडे केलेली आहे असाही युक्तीवाद त्यांनी केला होता.या पार्श्वभूमीवर पोर्शेची टीम पुण्यात दाखल झाली. या प्रकरणात पोर्शे कंपनीचे तंत्रज्ञ आरटीओ सोबत कार ची तपासणी करीत आहे. यामुळे हा दावाही खरा की खोटा हे ठरविण्यास मदत मिळणार आहे.
पोर्शे ही कार कंपनी जर्मनीची आहे. त्यामुळे पोर्शेचे जर्मनीचे प्रतिनिधी पुण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे प्रतिनिधी पुण्यात येऊन गाडीतील तांत्रिक बाबी तपासतील आणि
गाडीतील कॅमेऱ्यासंदर्भातदेखील माहिती घेणार असल्याची माहिती आहे.
मात्र हे जर्मनीचे पाहुणे नेमके कधी येणार आहेत त्याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.
दरम्यान ही पोर्शे कार येरवडा पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आली आहे.
येत्या काळात पुण्यात पावसाची शक्यता (Pune Rains) आहे.
या पावसामुळे गाडीतील तांत्रिक गोष्टींना धोका निर्माण होऊ शकतो.
गाडीतील पुरावे नष्ट होऊ शकतात.
त्यामुळे गाडीला पुणे पोलिसांनी पॅक करुन ठेवली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
UPI Payment | HDFC बँकेचा मोठा निर्णय, आता इतक्या रुपयांपेक्षा कमी असेल UPI व्यवहार तर येणार नाही SMS अलर्ट, जाणून