![Pune Porsche Car Accident Case](https://i0.wp.com/marathi.pune.news/wp-content/uploads/2024/05/Pune-Porsche-Car-Accident-Case.webp?fit=1024%2C576&ssl=1)
पुणे : Pune Porsche Car Accident Case | कल्याणीनगर येथील घडलेल्या अपघात प्रकरणी (Kalyani Nagar Accident) मोठमोठे खुलासे समोर येत आहेत. या अपघात प्रकरणी आतापर्यंत विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बिल्डर विशाल अगरवालच्या (Builder Vishal Agarwal) वकिलांनी पोर्शे कारमध्ये समस्या होती, असा दावा कोर्टात केला होता. याची तक्रारही कंपनीकडे केलेली आहे, असाही युक्तीवाद त्यांनी केला होता.
या पार्श्वभूमीवर पोर्शेची टीम पुण्यात (Porsche Team In Pune) दाखल झाली. या प्रकरणात पोर्शे कंपनीचे तंत्रज्ञ आरटीओ (Pune RTO Officers) सोबत कार ची तपासणी करीत आहे. यामुळे हा दावाही खरा की खोटा हे ठरविण्यास मदत मिळणार आहे.
यामध्ये बिल्डर मुलाने अपघात केला तेव्हाचा कारचा असलेला वेग, वेळ, कितीवेळा कार हार्ड ब्रेकिंग करण्यात आली, कितीवेळा वेगाने चालविण्यात आली याचा डेटा या आरटीओला दिला जाणार आहे. तसेच कारमध्ये इनबिल्ट डॅशकॅम होते. त्याचेही रेकॉर्डिंग मिळविण्यात आले आहे. या सर्व माहितीचा वापर बिल्डर मुलाविरोधातील भक्कम पुराव्यांसाठी केला जाणार आहे. (Pune Porsche Car Accident Case)
याचबरोबर आता पुणे पोलीस या सगळ्या अपघाताची माहिती मिळवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे.
पुणे पोलीस ‘एआय’द्वारे अपघाताची घटना जिवंत करणार आहे. ‘एआय’द्वारे अपघाताची घटना जिवंत करण्यात येणार आहे.
पुणे पोलीस (Pune Police) या प्रकरणात डिजीटल पुराव्यांवर (Digital Evidence In Pune Porsche Accident) भर देताना दिसत आहेत.
यासाठी हे पुरावे गोळा करणार आहे.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Sonia Doohan on Sharad Pawar NCP | मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, सोनिया दुहान म्हणाल्या,
शरद पवार आमचे नेते होते, आहेत, पण सुप्रिया सुळे…
Pune Crime News | पिंपरी : अल्पवयीन मुलीने देहविक्री करण्यास नकार दिल्याने चाकूने वार, तिघांना अटक
MNS Vs BJP | आम्ही महायुतीचे घटक नाही; पदवीधर निवडणुकीवरून मनसे भाजपात जुंपली