‘या प्रकरणात कोणत्याही पोलिसाचा सहभाग नाही, त्यामुळे चौकशीचा प्रश्नच येत नाही’ – पोलिस आयुक्त
पुणे : Pune Police News | पुणे पोलिसांच्या इतिहासातील सगळ्यात मोठी कारवाई मागील काही दिवसांत झाली आहे. पुणे पोलिसांनी तब्बल 4 हजार कोटी रुपयांचं एक हजार 800 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. पुणे पोलिसांनी पुणे, विश्रांतवाडी, कुरकुंभ आणि राजधानी दिल्लीमध्ये ही कारवाई केली. त्यानंतर आता एमडी ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा साठा जप्त केला आहे. पोलिसांनी एका ट्रकमधून ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारा 340 किलो कच्चा मालाचा साठा जप्त केला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar) यांनी दिली.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असताना एका आरोपीला कोलकत्ता येथून ताब्यात घेण्यात आले होते. त्याची आणि यापूर्वी अटक केलेल्या आरोपीची चौकशी करण्यात आली. चौकशीमध्ये विश्रांतवाडी येथील गोडाऊनमध्ये जो ड्रग्ज साठा सापडला होता, त्यातील एक आरोपी एमडी ड्रग्ज ट्रकमध्ये ठेवत असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्या ट्रकचा शोध घेतला असता तो ट्रक विश्रांतवाडी पासून तीन किलोमिटर अंतरावर आढळून आला. (Pune Drugs Case)
पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये 340 किलोचा साठा मिळाला. मिळालेला साठा हा एमडी आणि मेथ बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल आहे असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मात्र, नेमके ते काय आहे हे फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर समजेल. मात्र, चौकशी आणि प्राथमिक पाहणीवरुन ट्रकमध्ये सापडलेला साठा हा एमडी ड्रग्ज आणि इतर ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.(Pune Police News)
आत्तापर्यंत 9 जणांना अटक
एमडी ड्रग्ज प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात नऊ जणांना अटक केली आहे.
तर सात ते आठ आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
तसेच या प्रकरणात इतर आरोपी देखील निष्पन्न होण्याची शक्यता असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
एमडी बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल पोलिसांनी जप्त केला आहे, त्याची अद्याप किंमत सांगता येणार नाही. फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर त्याची किंमत समजेल, असेही त्यांनी सांगितले.
ड्रग्ज प्रकरणात एकाही पोलिसाचा संबंध नाही
पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन कोटी रुपयांचे एमडी जप्त केले आहे. याप्रकरणात एका पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग आढळून आल्याने अटक केली आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, आतापर्यंत या दोन्ही प्रकरणाच्या लिंक बाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. तसेच ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांनी अत्यंत उत्तम कामगिरी करुन रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात कोणत्याही पोलिसाचा सहभाग नाही, त्यामुळे चौकशीचा प्रश्नच येत नाही, असेही त्यांनी सांगितले.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pune Crime | आय लव्ह यू म्हणाली नाही म्हणून पत्नीला बेदम मारहाण, कात्रज परिसरातील घटना
पाच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, नराधम बापाला अटक; कोंढवा भागातील घटना