पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | भांडणाचा राग मनात धरुन दोघांनी एका तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार (Koyta Attack) करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.24) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास मुळशी तालुक्यातील माण येथील बोडकेवाड फाटा (Bodkewad Phata Man) येथे घडली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police Station) दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत जखमी आदर्श गौतम भोसले (वय-20 रा. भोसले वस्ती, माण, ता. मुळशी) यांनी मंगळवारी (दि.25) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन राहुल ठाकर, सनी ठाकर यांच्याविरोधात आयपीसी 326, 341, 323, 504, 506, 34 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्य़ादी यांच्यात सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास बाचाबाची झाली होती. याचा राग आरोपींच्या मनात होता. फिर्यादी रात्री मित्रासोबत दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी आरोपी पाठीमागून दुचाकीवर आले. त्यांनी फिर्य़ादी यांची दुचाकी अडवून ‘तुला लय माज आलाय का’ असे म्हणून शिवीगाळ करुन दमदाटी केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर सनी ठाकूर याने सोबत आणलेल्या धारदार कोयत्याने आदर्श भोसले याच्या डोक्यात वार करुन गंभीर जखमी केले. घटनेनंतर आरोपी तिथून पसार झाले. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Ajit Pawar NCP MLA On Mahayuti | …तर आम्हाला विधानसभा निवडणूक वेगळी लढवावी लागेल;
अजित पवार गटाचा महायुतीला इशारा
Pubs In Pune | फक्त 23 पब आणि डिस्कोना आहेत आवश्यक परवाने ! माहिती अधिकारात झाले उघड
IRCTC Online Ticket Booking | ऑनलाईन बुक करता येणार नाही नातेवाईकांचे ट्रेन तिकिट,
IRCTC ने सांगितले काय आहे सत्य
State Excise Department Pune | थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु! 69 परवाने निलंबित तर 6 कायमचे रद्द,
उत्पादन शुल्कची 17 पथके तपास करणार