पुणे : Pune Kalyani Nagar Porsche Car Accident News | पुण्यातील कल्याणी नगर भागातील पोर्शे कार अपघातात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या रात्री मद्यधुंद होतो, अशी कबुली अल्पवयीन मुलाने पोलिसांच्या चौकशीत दिली आहे. 19 मे रोजी मध्यरात्री भरधाव पोर्शे कारने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला होता. यावेळी आपण मद्यधुंद अवस्थेत असल्याची अल्पवयीन मुलाने कबुली दिली आहे. तसेच अपघाताबद्दल आपल्याला फारसे आठवत नसल्याचेही या मुलाने पोलीस (Pune Police) तपासात सांगितल्याची माहिती सुत्रांनी दिली. (Pune Kalyani Nagar Porsche Car Accident News)
एक जून रोजी पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाची आईच्या उपस्थितीत चौकशी केली. या चौकशीत आरोपी अल्पवयीन मुलाने आपण मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याची कबुली दिली. बाल न्याय हक्क मंडळाने (Juvenile Justice Board (JJB) 31 मे रोजी पुणे पोलिसांना (Pune Crime Branch) अल्पवयीन आरोपीची चौकशी करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार पोलिसांनी रविवारी अल्पवयीन मुलाची चौकशी केली.
आरोपी मित्रांचीही कबुली
पुणे पोलिसांनी आरोपीच्या मित्रांची कसून चौकशी केली. अल्पवयीन मुलाचे दोन्ही मित्र मागील सीटवर बसले होते. तो मद्यप्राशन करुन भरधाव वेगात कार चालवत होता, अशी माहिती अल्पवयीन मुलाच्या मित्रांनी पोलीस चौकशीत दिली आहे, असे सुत्रांनी दिलेल्या माहितीत समोर आले आहे. दरम्यान, कल्याणी नगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या दोन्ही मित्रांना पोलीस साक्षीदार करणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, याबाबत पुणे पोलिसांकडून कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
संपुर्ण कुटुंब आरोपीच्या पिंजऱ्यात
पोर्शे कार अपघातात संपुर्ण अग्रवाल कुटुंब आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. आरोपी अल्पवयीन मुलगा, त्याचे आई-वडिल, आजोबा अटकेत आहेत. तर अल्पवयीन मुलगा सध्या बालसुधारगृहात आहे. त्याला पाच जूनपर्यंत सुधारगृहात ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. अपघातानंतर चालक अपहरणाचा केल्या प्रकरणी विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) आणि आजोबा सुरेंद्र कुमार (Surendra Kumar Agarwal) यांना अटक केली आहे. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. तर शिवानी अग्रवाल (Shivani Vishal Agarwal) यांना पाच जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गुन्ह्यात 10 जणांना अटक
पुण्यातील कल्याणी नगरमध्ये रविवारी (दि.19 मे) मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात आयटी अभियंता असलेले अनिश अवधिया Aneesh Awadhiya (वय-27) आणि अश्विनी कोष्टा (Ashwini Costa) यांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघाताच्या वेळी आरोपी अल्पवयीन मुलागा त्याच्या ताब्यातील पोर्शे कार ताशी 160 किमीच्या वेगात चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलावर आयपीसी 279, 304(a), 337, 338, 427 आणि मोटार वाहन कायदा कलम 184 आणि 119/177 या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात विशाल अग्रवाल (वय 50), सुरेंद्रकुमार अग्रवाल, शिवानी अग्रवाल,
कोसी पबचे मालक नमन प्रल्हाद भुतडा Naman Prahlad Bhutada (वय 25),
मॅनेजर सचिन अशोक काटकर (वय 35), ब्लॅक पबचे (Blck Pub) संदीप रमेश सांगले (वय 35),
कर्मचारी नितेश धनेश शेवानी (वय 34) आणि मॅनेजर जयेश सतीश गावकर (वय 23),
ससून हॉस्पिटलचे (Sassoon Hospital) डॉ. अजय तावरे (Dr Ajay Taware),
डॉ श्रीहरी हळनोर (Dr Shrihari Halnor), वॉर्डबॉय अतुल घटकांबळे यांना पोलिसांनी अटक केलेली आहे.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Monsoon Update-Pune Rains | मान्सून तळकोकणात 4 जूनला प्रवेश करणार; पुण्यात 6 जूनला ‘आनंद सरी’
ACB Trap On Mhada Project Manager | दोन लाख 70 हजार रुपयांची लाच घेताना पुण्यातील
म्हाडा कार्यालयातील प्रोजेक्ट मॅनेजर अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
Pune News | पोर्शे कार अपघातानंतर पालकांची चिंता वाढली, मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी पालकांकडून
खासगी गुप्तेहेरांची मदत