![Pune Drugs Case](https://i0.wp.com/marathi.pune.news/wp-content/uploads/2024/06/Pune-Drugs-Case.webp?fit=1024%2C576&ssl=1)
पुणे : Pune FC Road Drugs Party | पुणे एफसी रोडवरील ड्रग्ज प्रकरणात एल थ्री बारमध्ये (L3 – Liquid Leisure Lounge) ड्रग्जचे सेवन करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी (Pune Police) ताब्यात घेतले आहे. एका तरुणाला पुणे पोलिसांनी तर दुसऱ्याला गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईतून ताब्यात घेतले. नितीन ठोंबरे (Nitin Thombare) आणि करण मिश्रा (Karan Mishra) असे ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे आहेत. दोन्ही तरुणांचे रक्ताचे नमुने (Blood Sample) तपासणीसाठी घेणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मात्र, त्यापूर्वीच दोघांनी ड्रग्जचे सेवन केल्याची कबुली दिली आहे. दोघेही 24-25 वर्ष वयोगटातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. हे दोन्ही तरुण एकमेकांचे मित्र असून रात्री दीडच्या सुमारास या दोघांना एल थ्री बारमध्ये एंट्री देण्यात आली होती.
एल थ्री पबच्या शौचालयात अंमली पदार्थांचे सेवन काही युवक करत असल्याचा दावा करणारा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, ड्रग्ज पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी या संपूर्ण पार्टीचे विश्लेषण सुरु केले. या हॉटेलमधील सीसीटीव्ही चे डीव्हीआर पोलिसांनी मॅनेजरसह सात जणांना ताब्यात घेतले आहे. तर उत्पादन शुल्क विभागाने हॉटेल सिल करुन हॉटेलमधील सामग्री जप्त केली. तसेच एल थ्री हॉटेलचा परवाना रद्द केला आहे. (Pune FC Road Drugs Party)
पब मध्ये प्रवेश देण्यापूर्वी वयाची शहानिशा करण्यात यावी. अल्पवयीन मुलांना पब, हॉटेलमध्ये प्रवेश देऊ नये,
तसेच त्यांना मद्य विक्री करण्यात येऊ नये. रात्री दीड नंतर पब सुरु ठेवू नयेत.
नागरिकांना त्रास झाल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल अशा सूचना पब चालकांना देण्यात आल्या होत्या.
त्यानंतरही या आदेशाचे आणि नियमांचे उल्लंघन होत असल्याचे व्हिडीओमध्ये असलेल्या वेळेवरुन स्पष्ट होत आहे.
यानंतर पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईला सुरुवात झाली.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pune Drugs Case | पुणे L3 – Liquid Leisure Lounge ड्रग्ज पार्टी प्रकरण :
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखी एका निरीक्षकाचे निलंबन; आतापर्यंत 6 जणांवर कारवाई