![Pune Police Officer Suspended](https://i0.wp.com/marathi.pune.news/wp-content/uploads/2024/01/Pune-Police-Officer-Suspended.webp?fit=1024%2C576&ssl=1)
पुणे : Pune Drugs Case | फर्ग्युसन रस्त्यावरील (FC Road Pune) लिकर लीजर लाउंज (एल थ्री) (L3 – Liquid Leisure Lounge Pub) पबमधील पार्टी प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी (Shivaji Nagar Police Station) पबचालक, व्यवस्थापक आणि पार्टी आयोजकासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करून त्यातील आठ जणांना अटक केली आहे. पार्टीमध्ये अमली पदार्थाचे सेवन करणार्या दोघांचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणात दोन पोलिस अधिकार्यांना निलंबन करण्यात आले आहे. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department Pune) एका निरीक्षकाला निलंबित केल्यानंतर सोमवारी या प्रकरणात आणखी एका सह निरीक्षकाला निलंबित केले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी सह निरीक्षक अनंत पाटील (Anant Patil) यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. एफसी रस्त्यावरील एल थ्री बारमधील पार्टीमध्ये मद्यविक्री प्रकरणात कर्तव्यात कसुर ठेवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याच प्रकरणात सोमवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विठ्ठल बोबडे (Vitthal Bobade) यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
आतापर्यंत 6 जणांवर कारवाई
पुणे एल थ्री बार पार्टी प्रकरणात पुणे पोलीस दलातील चार तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणात आतापर्यंत दोन पोलीस अधिकारी आणि दोन बीट मार्शल यांना निलंबित करण्यात आले आहे. तर शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल माने (PI Anil Mane), सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील (API Dinesh Patil), पोलीस हवालदार गोरख डोहिफोडे, पोलीस शिपाई अशोक अडसूळ यांना निलंबित करण्यात आले होते. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विठ्ठल बोबडे आणि सहनिरीक्षक अनंत पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.
L3 ड्रग्ज पार्टी प्रकरणात 8 जणांना अटक
पुण्यातील एल थ्री पार्टी प्रकरणात पुणे पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. यामध्ये संतोष विठ्ठल कामठे (रा. रंजनीगंध अपार्टमेंट, शिवाजीनगर), उत्कर्ष कालिदास देशमाने (रा. लेन नं. 10, साईप्रसार अपार्टमेंट, मुंजाबा वस्ती, धानोरी, पुणे), योगेंद्र गिरासे (रा. दवन सोसायटी, भुगाव, ता. मुळशी), रवि माहेश्वरी (रा. 382 पार्क, मॅजिस्ट्रीक उंड्री),
अक्षय दत्तात्रय कामठे (रा. माळवाडी, हडपसर), दिनेश मानकर (रा. नाना पेठ, पुणे), रोहन राजू गायकवाड (रा. भोसले पार्क, हडपसर),
मानस पस्कुल मल्लिक (वय-33 रा. जयजवान नगर, येरवडा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपींना सोमवारी पुणे सत्र न्यायालयात हजर केलं गेलं. आरोपींना 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा