पुणे : Pune Viman Nagar Crime | अल्पवयीन मुलीला घरी बोलवून तिच्यासोबत अश्लील कृत्य (Obscene Act) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police) एका तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार लोहगाव (Lohegaon) परिसरात जून 2019 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत घडला आहे.(Pune Viman Nagar Crime)
याबाबत 36 वर्षीय महिलेने गुरुवारी (दि.21) विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन शकील उर्फ गुड्डु मुश्ताक शेख (वय-27 रा. लोहगाव) याच्यावर आयपीसी 376, 376(3), 377, 506 सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच परिसरात राहतात. आरोपीने फिर्यादी यांच्या 13 वर्षाच्या मुलीला वेळोवेळी घरी बोलावून घेतले. आरोपीने तिच्यासमोर विवस्त्र होत अश्लील कृत्य केले. तसेच अश्लील कृत्य करतानाचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार अश्लील वर्तन केले.
पीडित मुलीने याबाबत आईला सांगितले. आईने विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांकडे तक्रार केली.
त्यानुसार शकील शेख याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार
प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मेढे करीत आहेत.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
प्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या बारामतीच्या तरुणाचा खून, बिबवेवाडी येथील घटना
Pune Murder Case | पिंपरी : मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन बेदम मारहाण करुन खून
Amba Mahotsav Pune | आंबा महात्सवाचे आयोजन ! अस्सल देवगड हापूस वाजवी दरात मिळणार
Pune Police News | पुणे: खाजगी वाहनाला पोलीस वाहनासारखी रंगरंगोटी करुन शासकीय कामासाठी
वापर केला जात असल्याचा आरोप, माहिती अधिकारात पोलिसांचा ‘प्रताप’ उघड;
संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी (Video)