पुणे : Pune Market Yard Crime | घराची विक्री करण्यास नकार दिल्याने संतापलेल्या मुलाने आपल्या वडिलांच्या डोक्यात लोखंडी पहार मारून गंभीर जखमी केले (Property Dispute). हा प्रकार रविवारी (दि.17) सकाळी साडे अकराच्या सुमारास मार्केट यार्ड येथील गंगाधाम फेज वन (Gangadham Chowk Pune) येथे घडला आहे. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी आई आणि मुलावर गुन्हा दाखल केला आहे.(Pune Market Yard Crime)
याबाबत भिमराव गजेंद्र पाडगळे (वय-52 रा. गंगाधाम फेज-1, मार्केट यार्ड) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) फिर्याद दिली. यावरुन मुलगा प्रशांत पाडगळे (वय-25), मालती पाडगळे (वय-43) यांच्यावर आयपीसी 324, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे हांडेवाडी येथे दोनमजली घर आहे. ते घर विकायचे असून ते घर विकण्यासाठी लागणारे घराचे कागदपत्रे येणार असल्याचे फिर्यादी यांच्या मुलाने सांगितले.
यावरून फिर्यादी व त्यांच्या मुलामध्ये वाद झाले. फिर्याद हे मुलाला समजूव सांगत घर विकायचे नाही असे सांगितले. वाद सुरु असताना फिर्यादी यांची पत्नी त्याठिकाणी आली. त्यावेळी फिर्यादी व त्यांच्या पत्नीमध्ये वाद सुरु झाला. त्यावेळी आरोपी मुलाने घरातील लोखंडी पहार फिर्यादी यांच्या डोक्यात मारली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन फिर्यादी यांना जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
मालमत्तेच्या वादातून विळ्याने वार
लोणी काळभोर : वडिलोपार्जित मालमत्तेचा वाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर विळ्यासारख्या
धारदार हत्याराने वार केले (Attempt To Kill). ही घटना लोणी काळभोर गावच्या हद्दीतील वडालेवस्ती येथे शुक्रवारी (दि.15) सकाळी अकराच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत दिपाली संतोष जगताप (वय-32 रा. घोरपडे वस्ती, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात
(Loni Kalbhor Police Station) फिर्य़ाद दिली. यावरुन फिर्यादी यांचे दिर नागेश जगताप, स्वाती जगताप,
वत्सलाबाई जगताप, प्रतीक जगताप यांच्यावर आयपीसी 324,323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी यांचे पती संतोष जगताप हे वडालेवस्ती येथे दिराच्या घरी वडीलोपार्जित मालमत्ता वाटपाबाबत चर्चा
करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी चिडून जाऊन शिवीगाळ व दमदाटी केली.
तर सासू वत्सलाबाई यांनी विळ्यासारख्या धारदार हत्यारने वार करुन जखमी केले.
तसेच फिर्यादी यांच्या बहिणीला हाताने मारहाण केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Rohit Pawar On BJP | भाजपने पक्ष फोडताना पवार कुटुंबही फोडले; रोहित पवार यांची खंत
RMD Foundation | आर एम डी फाऊंडेशन उभारणार शेतकऱ्यांसाठी ‘ऍग्रीकल्चर नॉलेज हब’ – शोभाताई आर धारीवाल
Pune CP Office New Building | पुणे पोलीस आयुक्तालयाचे रुप पालटणार, राज्य सरकारकडून 193 कोटींचा निधी