पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime | बेकायदेशीररित्या जमाव जमवून लॅबमध्ये घुसून सासरच्या मंडळींनी जावयाकडे 25 लाख रुपये खंडणीची (Extortion Case) मागणी केली. तसेच गाडीमध्ये डांबून ठेवून बेदम मारहाण केली. हा प्रकार 18 ऑक्टोबर 2023 रोजी काळेवाडी येथील बायोसायन्स बायोटेक लॅबोरेटरी येथे घडला आहे. याप्रकरणी पाच महिन्यांनी 12 जणांवर वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime)
याबाबत महादेव ज्ञानोबा जाधव (वय-35 रा. निडेबत रोड, ता. उदगीर जि. लातूर सध्या रा. डांगे चौक, थेरगाव) यांनी शनिवारी (दि.16 मार्च) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अनिल शंकर घोणसे (वय-60), सुनिल शंकर घोणसे (वय-58), माधव पाटील (वय-55) भास्कर पाटील (वय-45), काका हिवराळे (वय-47), गोट्या उर्फ अश्विन पाटील (वय-24) महिला आरोपी (सर्व रा. पो. निवळी ता. मुखेड जि. नांदेड) यांच्यासह इतर पाच अनोळखी व्यक्तींवर आयपीसी 383, 384, 385, 324, 323, 447, 452, 504, 506, 143, 147, 149 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बेकायदेशीरपणे जमाव जमवून फिर्यादी यांच्या लॅबमध्ये प्रवेश केला. त्यांच्याकडे 25 लाख रुपये खंडणीची मागणी केली. तसेच जबरदस्तीने इर्टिगा कारमध्ये डांबून गाडीत मारहाण करीत वाकड पोलीस ठाण्यात घेऊन आले.
फिर्यादी जाधव यांच्या पत्नीने त्यांच्यावर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात सासरचे लोक त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यासाठी गेले होते. जाधव यांनी पोलीस ठाण्यात येण्यास नकार दिल्याने आरोपींनी फिर्यादी यांना जबरदस्तीने पोलीस ठाण्यात आणले. फिर्यादी जाधव यांनी याबाबत न्यायालयात दाद मागितली.
त्यानंतर न्यायालयाने आरोपींविरोधात खंडणी मागणे, मारहाण करणे,
बेकायदेशीर जमाव जमवणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश वाकड पोलिसांना दिली.
न्यायालयाच्या आदेशानुसार बारा जाणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी मेटे (PSI Balaji Mete) करीत आहेत.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pune CP Office New Building | पुणे पोलीस आयुक्तालयाचे रुप पालटणार, राज्य सरकारकडून 193 कोटींचा निधी
Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणूक 2024 : देशात 96 कोटी मतदार, 5 लाख मतदान केंद्र;
निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती