पुणे : Pune Yerawada Crime | अंगावरील सर्व कपडे काढून महिलेकडे पाहून अश्लील हावभाव (Obscene Gestures) करुन विनयभंग (Molestation Case) केल्याची संतापजनक घटना येरवडा परिसरात घडली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.1) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास यशवंत नगर, येरवडा (Yashwant Nagar Yerawada) येथे घडला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerawada Police) एकावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका महिलेने मंगळवारी (दि.2) येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन धनराज महेश थोरात Dhanraj Mahesh Thorat (वय-26 रा. यशवंत नगर, येरवडा) याच्यावर आयपीसी 354, 354 (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व त्यांची नणंद घराच्या दारात गप्पा मारत होत्या. आरोपी धनराज थोरात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास महिलेच्या घरासमोर आला. त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. त्याने स्वत:च्या अंगावरील सर्व कपडे काढून महिलेकडे पाहून अश्लील हावभाव करुन महिलेच्या स्त्री मनास लज्जा उत्पन होईल असे कृत्य केले. आरोपीने यापूर्वी देखील महिलेचा पाठलाग करुन विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.
महिलेकडे पाहून अश्लील वर्तन
वारजे : महिलेचा पाठलाग करुन तिच्याकडे पाहून अश्लील वर्तन केल्याचा प्रकार वारजे माळवाडी परिसरात घडला आहे.
हा प्रकार मंगळवारी (दि.2) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
याप्रकरणी 24 वर्षीय महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police) फिर्याद दिली आहे.
यावरुन एका 20 ते 22 वर्षीय अनोळखी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा