पुणे : Pune Crime News | पुणे शहरामध्ये वाहन चोरीच्या (Vehicle Theft) घटना वारंवार घडत असतात. आता तर चोरट्यांनी पोलिसांनाच ओपन चॅलेंज दिले आहे. वाहन चोरांनी सर्वसामान्य नागरिकांसह पोलिसांची देखील वाहने चोरून नेली आहेत. ही वाहने चक्क पोलीस आयुक्तालयासमोरून (Pune CP Office) चोरून नेली आहेत. पोलीस आयुक्त कार्यालय परिसरात सीसीटीव्ही (CCTV Camera) असताना आणि पोलिसांची सतत ये-जा असताना चोरट्यांनी पोलिसांची वाहने चोरुन नेल्याने खळबळ उडाली आहे.
पुण्यात लोकसभा निवडणुकीची (Pune Lok Sabha) मतदान प्रक्रीया सोमवारी (दि.13) पार पडली. मतदान प्रक्रियेच्या कालावधीत पोलीस प्रशासन गुंतलेले असताना चोरट्यांनी पोलीस आयुक्तालयासमोरील पार्किंगमधून तीन दुचाकी चोरुन नेल्या. याबाबत अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती मिळत आहे. हा प्रकार 12 ते 14 मे या कालावधीत घडल्याचे समजते.
पुणे शहरातील विविध भागातून दररोज पाच ते सात दुचाकी चोरीला जातात. याबाबत पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येतो. मात्र, चोरटे सापडत नाहीत आणि वाहने देखील मिळत नाहीत.
चोरट्यांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून पोलीस आयुक्तालयातून वाहने चोरी करण्याचे धाडस दाखवून पोलिसांना एक प्रकारे चॅलेंज दिल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
त्यामुळे सर्व सामान्यांची वाहने सुरक्षित नाहितच शिवाय पोलीस आयुक्तालयासमोरील पार्किंगमध्ये पार्क केलेली
पोलिसांची वाहने देखील सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Sharad Pawar On PM Narendra Modi | पंतप्रधानांच्या टीकेला शरद पवारांचे उत्तर,
…यामुळे मोदींना का त्रास झाला ते मला समजले नाही