पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | ब्रँडेड कंपनीचा लोगो (Branded Company Logo) वापरुन बनावट कपड्यांची विक्रीप्रकरणी (Sale Of Fake Clothes) पिंपरी बाजारातील (Pimpri Market) दोन दुकानदारांवर कॉपीराईट अॅक्ट (Copyright Act) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.30) दुपारी दोन ते सायंकाळी साडेपाच या वेळेत करण्यात आली. या कारवाईत साई चौकातील (Sai Chowk Pimpri) शिव गारमेंट्स (Shiv Garments Pimpri), संजय ट्रेडलिंक (Sanjay Tradelinks Pimpri) या दोन दुकानातून 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
संजय चंद्रकांत भोजवानी Sanjay Chandrakant Bhojwani (रा. ज्योतीबा मंगल कार्यालयाजवळ, काळेवाडी, पिंपरी), संजू दिलीप बसतांनी Sanju Dilip Basatani (रा. एसके पलास पॅराडाईज, नव महाराष्ट्र शाळेजवळ, पिंपरी) यांच्या विरोधात कॉपीराइट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महेश विष्णू कांबळे (वय-41 रा. जनवाडी, शिवाजीनगर, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी महेश विष्णू हे युनायटेड अँड युनायटेड ट्रेडमार्क अँड अॅथोरिटी नवी दिल्ली या कंपनीत तपासी अधिकारी म्हणून काम करतात. त्यांच्या कंपनीकडून कॉपी राईट हक्काचे कोणी उल्लंघन करत असेल तर त्याच्या विरोधात कॉपीराईट कायदा व ट्रेडमार्क कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येते. सध्या त्यांच्या कंपनीकडे अंडर आर्मर, नायके, जॉर्डन या विदेशी ट्रेडमार्क कंपनीचे अधिकृत कॉपीराईट व ट्रेडमार्क कायद्याप्रमाणे कारवाई करण्याचे अधिकार आहेत.
दरम्यान, पिंपरी कॅम्प येथे काही दुकानांमध्ये अंडर आर्मर, नायके, जॉर्डन कंपनीचा बनावट लोगो वापरुन कपडे विक्री होत असल्याची माहिती त्यांना मिळाली.
फिर्य़ादी यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पोलिसांनी फिर्यादी यांच्यासह साई चौक परिसरातील दुकानात जाऊन पाहणी केली असता बनावट कपड्याची विक्री केली जात असल्याचे समोर आले.
आरोपींनी त्यांच्या दुकानात फिर्यादी यांच्या कंपनीचे स्वामित्व असलेल्या अंडर आर्मर,
नायके, जॉर्डन कंपनीचे बनावट टी शर्ट, शॉर्ट पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट, जॅकेट विक्री करताना व
विक्रीसाठी ठेवल्या असताना आरोपी मिळून आले.
या कारवाईत पोलिसांनी 10 लाख 31 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग (Sr PI Ashok Kadlag) करीत आहेत.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Nana Patole On India Aghadi | इंडिया आघाडी 300 पार , महाराष्ट्रात… नाना पटोलेंचा दावा
Pune Crime News | पुणे : जन्मदात्या बापानेच केले अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे, नराधम बापाला अटक