पुणे : Loni Kalbhor Pune Crime News | एशियन पेंट या नामांकित कंपनीचा बनावट पेंट तयार करुन त्याची विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police Station) दोन परप्रांतियांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 3 लाख 64 हजार 506 रुपयांचा बनावट एशियन पेंट जप्त केला आहे.
स्वयंम मिरुनाथ सिंग (वय 33, सध्या रा.माऊटन रागा, उरुळी देवाची ता. हवेली, मुळगाव पोस्ट ड्रेली मारिया, तहसील दरौली जि. सीवान राज्य बिहार), शिवकुमार महेंद्र पासवान (सध्या रा. पेट्रोल पंपाशेजारी हडपसर, मुळ गाव मेहसी, रेहनरक्षा, जि. जबलपुर राज्य बिहार) यांच्यावर कॉपीराईट कायदा 1957 चे कलम 51, 63 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. याबाबत एशियन कंपनीचे अधिकारी सुभाष हरिश्चंद्र जयस्वाल (वय 41, रा. सोहम सानिध्य, सरदार पटेल रिंग रोड, रामोल, अहमदाबाद, गुजरात) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एशियन पेंटच्या दिल्लीतील कार्यालयात काम करतात. उरुळी देवाची ग्रामपंचायत हद्दीत बनावट एशियन पेंट तयार करुन त्याची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार फिर्यादी यांनी गुंजाळ माळ परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन पाहणी केली.
त्या ठिकाणी आरोपी एशीयन पेंट कंपनीचा बनावट पेंट व कंपनीच्या नावाच्या बनावट डब्याची विक्री करता वापर करत होते.
याबाबत जयस्वाल यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून पावणे चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख करीत आहेत.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pune Drugs Case | पुणे L3 – Liquid Leisure Lounge ड्रग्ज पार्टी प्रकरण :
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखी एका निरीक्षकाचे निलंबन; आतापर्यंत 6 जणांवर कारवाई