पुणे : NIBM Road Kondhwa Pune Crime News | संगनमत करून खोटे व बनावट दस्तावेज तयार करून एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 4 मे 1974 ते 20 एप्रिल 1982 या कालावधीत एनआय बीएम रोड येथील से.नं. 18 येथे घडला आहे.
याबाबत अब्दुल हमीद जाफरी (वय-74 रा. लि-मिरागे, बोट क्लब रोड, पुणे) यांनी मंगळवारी (दि.25 जून) कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजयकुमार देवराज मेहता (वय-74), शकुंतला विजयकुमार मेहता (वय-70 दोघे रा. युनिव्हर्सल अपार्टमेंट, ईस्ट स्ट्रीट कॅम्प, पुणे), रामचंद्र गोपाळ भाटे (वय-58 रा. एकोपा सोसायटी, गुलटेकडी, पुणे), श्रीकांत सुरजप्रकाश शर्मा (वय-58 रा. गणेश पेठ, पुणे) यांच्यावर आयपीसी 419, 420, 467, 468, 471, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल जाफरी यांच्या मालकीची एनआयबीएम रोड कोंढवा येथील से.नं. 18 हिस्सा नं. 2 येथे एक हेक्टर 49 आर जमीन आहे. आरोपींनी संगनमत करुन स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादी यांच्या मालकीच्या जमीनीचे बनावट साठेगत तयार केले. त्याची दस्त नोंदणी केली. त्या कागदपत्राच्या आधारे बनावट विकसन करारनामा करुन फिर्यादी यांची फसवणूक केली. त्यानंतर फिर्य़ादी यांना जमीनीबाबत तडजोड करुन घेण्यासाठी धमकावल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. (Pune Crime News)
महिलेची सात लाखांची फसवणूक
पुणे : धानोरी परिसरातील एका 49 वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलिसांना फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांनी महिलेला संपर्क करून स्टॉक ट्रेडिंग मध्ये पैसे कमावता येतील, असे सांगितले. त्यासाठी महिलेकडून 7 लाख 26 हजार रुपये घेतले. मात्र, कोणताही नफा न देता फसवणूक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक साळुंखे करत आहेत.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pubs In Pune | फक्त 23 पब आणि डिस्कोना आहेत आवश्यक परवाने ! माहिती अधिकारात झाले उघड