![Budhwar Peth Firing Trying](https://i0.wp.com/marathi.pune.news/wp-content/uploads/2024/06/Budhwar-Peth-Firing-Trying.webp?fit=1024%2C576&ssl=1)
पुणे : Budhwar Peth Pune Crime News | पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. सिंहगड रस्ता (Sinhagad Road Firing Case) परिसरात अल्पवयीन मुलाने गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच बुधवार पेठेत एका युवकाला पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी (Death Threat) दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.23) रात्री पावणे दहाच्या सुमारास बुधवार पेठेतील सार्वजनिक रोडवर घडला आहे.
याबाबत प्रसाद अरुण भोसले (वय-33 रा. मारुती हाईट्स, कसबा पेठ, पुणे) यांनी सोमवारी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार विजय केशवराव घुमारे Vijay Keshavrao Ghumare (वय-50 रा. श्री सरस्वती हाईट्स, बुधवार पेठ, पुणे) याच्यावर आयपीसी 307, 504, महाराष्ट्र पोलीस कायदा, आर्म अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Faraskhana Police Station)
पोलीस उपनिरीक्षक भिमराव मांजरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय घुमारे आणि फिर्य़ादी प्रसाद भोसले यांच्यात एक महिन्यापूर्वी थुंकल्याच्या कारणावरुन वाद झाला होता. याचा राग आरोपीच्या मनात होता. रविवारी रात्री फिर्य़ादी व त्यांचे इतर चार मित्र बुधवार पेठेतील श्री सरस्वती हाईट्स समोरील सार्वजनिक रोडवर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी फिर्यादी यांना खोकला आला. याचा राग धरुन व एक महिन्यापूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरुन आरोपी विजय घुमरे याने कंबरला असलेले पिस्टलसारखे हत्या बाहेर काढले. (Pune Crime News)
पिस्टल लोड करुन प्रसाद भोसले यांच्या पोटाला लावून शिवीगाळ केली.
तसेच पिस्टलमधील सर्व राऊंड तुझ्या पोटात फायर करेन.
तुला आता जिवंत ठेवत नाही, तुला खल्लास करुन टाकतो, मला किरकोळ समजतो का?
असे म्हणून आरोपीने पिस्टलचे टिगर दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
पिस्टल मधून गोळी सुटली नसल्याने फिर्य़ादी थोडक्यात बचावले.
आरोपीने पिस्टल बाळगून परिसरात दहशत माजवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पिएसआय भिमराव मांजरे करीत आहेत.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pune Drugs Case | पुणे L3 – Liquid Leisure Lounge ड्रग्ज पार्टी प्रकरण :
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखी एका निरीक्षकाचे निलंबन; आतापर्यंत 6 जणांवर कारवाई