पुणे : Pune Crime News | पुणे शहरामध्ये घरफोडीचे सत्र सुरुच आहे. शहरात चार वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम, टीव्ही तसेच इतर साहित्य चोरुन नेले आहे. चोरट्यांनी पावणे तीन लाखांचा ऐवज चोरुन नेला आहे. या घटना लोणीकंद (Lonikand), हडपसर (Hadapsar), स्वारगेट (Swargate), सिंहगड रोड (Sinhagad Road) परिसरात घडल्या आहेत. (House Burglary)
स्वारगेट परिसरातील सॅलीसबरी पार्क येथील मानसी इंटरप्रायजेस या दुकानातून दोन अज्ञात चोरट्यांनी 43 हजार रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून मुद्देमाल चोरुन नेला आहे. याप्रकरणी सत्यदेव रामधणी तिवारी (वय-35 रा. पुण्यधाम आश्रम रोड, पुणे) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून हा प्रकार 28 जानेवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबिकर करीत आहेत.(Pune Crime News)
घरफोडीची दुसरी घटना वडगाव बुद्रुक येथे घडली आहे. चोरट्यांनी बंद सदनिकेच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. बेडरुमधील कपाटात कापडी पिशवीत ठेवलेले 62 हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरुन नेले. हा प्रकार रविवारी (दि.10) दुपारी सव्वा एकच्या सुमारास उघडकीस आला. हा प्रकार गोसावी वस्ती येथील हिराई रेसिडेन्सी येथे घडला आहे. याबाबत श्वेता साईनाथ शिंदे (वय-28) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
घरफोडीची तिसरी घटना केसनंद येथील जोगेश्वरी पार्क येथे घडली आहे.
अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. घरातील सीसीटीव्ही फुटेजचा डिसीआर, दोन एलसीडी, 32 इंची टिव्ही, म्युजीक सिस्टीम, गॅस शेगडी असा एकूण 38 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. हा प्रकार रविवारी (दि.10) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. याबाबत सुजाता संजय पंडीत (वय-50 रा. विमाननगर, पुणे) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
घरफोडीची चौथी घटना हडपसर परिसरात घडली आहे.
चोरट्यांनी पत्र्याच्या शेडच्या गोडाऊनचे पत्रे उचकटून गोडाऊनमध्ये प्रवेश केला. गोडाऊनमध्ये ठेवलेले बोरोप्लस क्रिम, फेअरनेस क्रिम व झंडु बाम असा एकूण एक लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार शनिवारी (दि.9) सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आला. याबाबत विकासकुमार विजयकुमार गुप्ता (वय-43 रा. घोरपडी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
छोटा शेख सल्ला दर्गा: ‘रील’ व्हायरल करुन अफवा पसरवणाऱ्या दोघांवर वानवडी पोलिसांकडून FIR
लष्करात नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणारा कोंढवा पोलिसांकडून गजाआड