![Wanwadi-Police-Station](https://i0.wp.com/marathi.pune.news/wp-content/uploads/2024/03/Wanwadi-Police-Station.webp?fit=1024%2C576&ssl=1)
पुणे : Wanwadi Pune Crime News | डॉक्टरकडे चांगले काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून (Lure Of Job) तरुणीला हडपसर येथील लॉज (Hadapsar Lodge ) आणि फलटण (Phaltan) येथील एका सोसायटीत नेऊन तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय (Prostitution Business) करुन घेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा खळबळजनक प्रकार 3 मे रोजी सकाळी अकरा ते 9 मे दुपारी दोनच्या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी दोघांवर वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत 22 वर्षीय पीडित तरुणीने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन रेश्मा दिदी व तिचा भाऊ सोहेल शेख (रा. सय्यदनगर, हडपसर यांच्यावर आयपीसी 370, 354, 324, 34 सह अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडित तरुणीला डॉक्टरकडे चांगले काम लावून देतो असे आमिष दाखवले. पहिल्यांदा तिला दुचाकीवरुन राहत्या घरी नेले. त्यानंतर हडपसर येथील लॉजवर नेले. त्यानंतर फलटण येथील एका सोसायटीत नेले. (Pune Crime News)
फलटण येथे तरुणीला जबरदस्तीने दारु पाजण्याचा प्रयत्न करुन तिला वेश्याव्यवसायाला लावण्याचा प्रयत्न केला.
आरोपी सोहेल याने मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला.
पीडित तरुणीने त्याला विरोध केला असता त्याने मुलीला शिवीगाळ केली.
तसेच कमरेच्या पट्ट्याने आणि हाताने मारहाण केली. यामध्ये तिच्या गालावर, डोळ्याखाली व पायावर गंभीर जखमा झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र करणकोट (PI Rajendra Karankot) करीत आहेत.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड
Pune Collector Dr Suhas Diwase | मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात (मोबाईल, कॉडलेस फोन,
पेजर, वायरलेस फोन वर बंदी) प्रतिबंधात्मक आदेश (Video)