पुणे : Yerawada Pune Crime News | बहिणीला पळून नेल्याच्या कारणावरुन तरुणीच्या भावाने एका ज्येष्ठ नागरिकावर धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके (Sr PI Ravindra Shelke) यांनी दिली. हा प्रकार सोमवारी (दि.24) दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडला आहे. (Murder In Yerawada Pune)
कटाळू कचरू लहाडे (वय 60 रा. सर्वे नंबर – 115, राजीव गांधी नगर, येरवडा) असे खून झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी इस्माईल रियाज शेख (वय- 25, धंदा- मजूर, रा. राजीव गांधी नगर, येरवडा) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कटाळू लहाडे यांच्या मुलाने आरोपी इस्माईल शेख याच्या बहिणीला घेऊन गेला आहे. याचा राग आल्याने आरोपीने लहाडे यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने लहाडे यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. (Pune Crime News)
पोलिसांनी आरोपी इस्माईल शेख याला ताब्यात घेतले आहे.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कायदा व सुव्यवस्थेचा काही प्रश्न नसल्याचे शेळके यांनी सांगितले. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Punit Balan Group (PBG) | पुनीत बालन ग्रुप आणि भारतीय लष्कराच्या माध्यमातून कश्मीर खोऱ्यात पहिला
“लेझर, लाईट आणि साउंड शो” संपन्न (Video)